Maharashtra Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयामुळे आता या संबंधित नोकरदार मंडळीला आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना पाच लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
या अनुषंगाने 10 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटी , महाराष्ट्र शासन मार्फत एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार आता महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र ठरणार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे या परिपत्रकात राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील सरकारी / निमसरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कार्ड निर्माण करण्यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत.
म्हणजेच आता राज्य शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारासाठी पात्र राहणार आहेत.
नक्कीच सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा निर्णय शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा दिलासाचा ठरणार आहे. शासनाची आयुष्मान भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर्वसामान्य गरीब कुटुंबांसाठी वरदान ठरले आहे.
या योजनेतून दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ दिला जातोय. यामुळे ज्यांना उपचारासाठी पैसा खर्च करता येणे अशक्य आहे त्यांच्यासाठी ही योजना कामाची ठरते.
दरम्यान आता राज्य शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना पण याचा लाभ दिला जाणार असल्याने सर्व सरकारी / निमसरकारी अधिकारी / कर्मचारी यांनी स्वत : चे व त्यांच्या कुटुंबियाचे त्याचबरोर आप्तस्वकीयांचे आयुष्यमान कार्ड Beneficiary Login मधुन निश्चित कालावधीत निर्माण करावेत अशा सूचना निर्गमित झाल्या आहेत.
याकरीता प्रत्येक सरकारी कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत व त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करुन सादर करणेबाबतच्या सूचना सुद्धा संबंधितांकडे प्राप्त झाल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, कॉन्ट्रॅक्ट वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता.
याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा असाच कार्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत आणि एका ठराविक कालावधीत 100% कर्मचाऱ्यांचे आयुष्यमान कार्ड बनवण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत.













