Maharashtra Government Employee : सरकारी नोकरी हे बहुतांशी तरुणांचे एक दिवास्वप्न असते. अनेक जण सरकारी नोकरीसाठी तयारी करतात.
अर्थात सर्वांनाच सरकारी नोकरी मिळत नाही, पण लाखो रुपयांच्या पॅकेज असणाऱ्या खाजगी नोकरीपेक्षा सरकारी नोकरीला आपल्या समाजात विशेष महत्त्व आणि मान दिला जातो.

मल्टिनॅशनल कंपनीत काम करण्यापेक्षा सरकारी नोकरी करण्याकडे नवयुवक तरुण-तरुणींचा अधिक कल दिसून आला आहे. यामागे एक कारण आहे ती म्हणजे सरकारी नोकरीमध्ये असणारी सुरक्षितता आणि त्यांना दिले जाणारे वेगवेगळे लाभ.
सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त वेगवेगळे प्रकारचे भत्ते सुद्धा मिळत असतात. दरम्यान आज आपण अशाच एका भत्त्याची माहिती येथे पाहणार आहोत.
म्हणून जर तुम्ही सरकारी नोकरदार असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तरी तुम्ही आजची बातमी आवर्जून वाचायला हवी.
खरेतर, राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करण्यासाठी वास्तव्य व दैनंदिन खर्चासाठी भत्ते दिले जातात. शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामानिमित्ताने बाहेरगावी प्रवास करावा लागतो.
यासाठी सरकारकडून हे भत्ते दिले जातात. दरम्यान सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत वित्त विभागामार्फत 2022 साली या भत्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
या निर्णयानुसार आज आपण राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनस्तरानुसार हॉटेल वास्तव्य भत्ता तसेच भोजन व संकीर्ण खर्चासाठी देण्यात येणाऱ्या दैनिक भत्त्याचे दर कसे आहेत याचा आढावा येथे घेणार आहोत.
हॉटेलमध्ये राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना किती भत्ता मिळतो?
सरकारी कामकाजाच्या निमित्ताने देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई व हैद्राबाद या महत्त्वाच्या महानगरांमध्ये दौऱ्यावर गेलेल्या राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या दरांनुसार भत्ते दिले जातात.
वर सांगितलेल्या मेट्रो शहरांमध्ये हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यासच संबंधित भत्ता अनुज्ञेय राहतो. शासनाच्या नियमानुसार वेतनस्तर एस–30 व त्यापेक्षा अधिक असलेल्या अधिकाऱ्यांना हॉटेल वास्तव्याकरिता प्रतिदिन 7,500 रुपये इतका भत्ता देय राहणार असून भोजन व संकीर्ण खर्चासाठी प्रतिदिन कमाल 1,200 रुपये अदा करण्यात येणार आहेत.
वेतनस्तर एस–25 ते एस–29 या गटातील अधिकाऱ्यांना हॉटेल वास्तव्याकरिता प्रतिदिन 4,500 रुपये तर भोजन व संकीर्ण खर्चासाठी प्रतिदिन 1,000 रुपयांपर्यंत भत्ता देण्यात येईल.
वेतनस्तर एस–20 ते एस–24 असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हॉटेल वास्तव्याकरिता प्रतिदिन 2,250 रुपये आणि भोजन व संकीर्ण खर्चासाठी प्रतिदिन कमाल 800 रुपये देण्यात येणार आहेत.
तसेच वेतनस्तर एस–19 व त्यापेक्षा कमी असलेल्या कर्मचाऱ्यांना हॉटेल वास्तव्याकरिता प्रतिदिन 1,000 रुपयांपर्यंत व भोजन व संकीर्ण खर्चासाठी प्रतिदिन 500 रुपयांपर्यंत भत्ता अनुज्ञेय राहणार आहे.
या सुधारित दरांमुळे महागड्या महानगरांमध्ये दौऱ्यावर जाणाऱ्या राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, वास्तव खर्चाशी सुसंगत अशी प्रतिपूर्ती मिळण्यास मदत होणार आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे प्रवास व दौऱ्याच्या काळातील गैरसोयी कमी होऊन प्रशासनाच्या कामकाजात अधिक सुलभता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.













