महाराष्ट्र राज्य शासनाचा मोठा निर्णय ! ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात झाली मोठी वाढ

Published on -

Maharashtra Government Employee : महाराष्ट्रातील काही शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. एका महत्वपूर्ण शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात शासनाकडून वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता आचारसंहिता लागू झाली आहे.

काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले अन आचारसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याआधीच राज्य मंत्रिमंडळाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे आणि बहुप्रतिक्षित निर्णय घेण्यात आलेत आणि या निर्णयामुळे राज्यातील सर्वच स्तरावरील नागरिकांना फायदा मिळणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसंदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय झाला.

आरोग्य विभागातील काही फ्रंट लाईन वर्कर च्या मानधनात वाढ करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या विस्तारीत योजनेसाठी सरकारने काही फ्रंट लाईन वर्कर्स नियुक्त केले होते.

या अंतर्गत आयुष्मान कार्ड निर्माण व वितरण करणे हे या कर्मचाऱ्यांचे काम होते. दरम्यान याच क्षेत्रिय स्तरावरील कर्मचा-यांच्या (Front Line Workers) मानधनात वाढ करण्यास फडणवीस शासनाच्या माध्यमातून अगदीच आचारसंहिता लागू होण्याच्या तोंडावरच करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय महाराष्ट्र राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करण्याच्या निर्णयात दुरुस्तीस मान्यता सुद्धा दिली आहे. या अभियानात 14 मार्च 2024 रोजी दहा वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर समायोजन करण्यात येणार आहे.

सेवा प्रवेश नियमांत दुरूस्ती न करता, एक वेळची बाब म्हणून समायोजन केले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदांबरोबर, ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe