महाराष्ट्र वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! थेट मुलाखतीने होणार निवड, 10 वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा सविस्तर…

महाराष्ट्र वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे वनविभागात निघालेल्या या भरतीसाठी दहावी पास उमेदवार सुद्धा पात्र राहणार आहेत आणि थेट मुलाखतीने उमेदवारांची निवड होणार आहे.

Maharashtra Government Job : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे वनविभागात निघालेल्या या भरतीसाठी दहावी पास उमेदवार सुद्धा पात्र राहणार आहेत आणि थेट मुलाखतीने उमेदवारांची निवड होणार आहे.

या पदभरतीची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. दरम्यान, आता आपण या पदभरतीची सविस्तर जाहिरात अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र राहणार, किती जागांसाठी ही भरती निघाली आहे, पदभरतीची प्रोसेस कशी राहणार ? याबाबत डिटेल माहिती आता आपण पाहणार आहोत.

कोणत्या पदांसाठी निघाली आहे भरती?

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे जल प्रकल्प मदतनीस, निसर्गानुभव प्रकल्प, सौर ऊर्जा तांत्रिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती निघाली आहे.

किती पदांसाठी होणार भरती?

वर नमूद केलेल्या पदांच्या 11 जागांसाठी ही भरती करण्यात आली आहे. ही भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

जल प्रकल्प मदतनीस या पदासाठी दहावी पास उमेदवार पात्र राहतील. मात्र सदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

निसर्गानुभव प्रकल्पासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात.

सौर ऊर्जा तांत्रिक पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. पण, त्यांच्याकडे सोलर तांत्रिक कामाचा अनुभव असायला हवा.

डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. मात्र सदर उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

उमेदवारांची निवड कशी होणार ?

या पदभरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. म्हणजेच या भरतीसाठी कोणतीच लेखी परीक्षा राहणार नाही.

मुलाखत कुठे अन केव्हा होणार?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबर 2024 रोजी या पद भरतीसाठी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर येथे ही मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe