महाराष्ट्रात तयार होणार 2 नवीन आयटी पार्क ! लाखो लोकांना मिळणार रोजगार, ‘या’ ठिकाणी तरुणांसाठी ट्रेनिंग सेंटर पण सुरू होणार

Published on -

Maharashtra IT Park : भारताची अर्थव्यवस्था ही सध्या स्थितीला चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे येत्या काळात आपली अर्थव्यवस्था आणखी बळकट होणार आहे. देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत आपल्या महाराष्ट्र राज्याचा देखील मोठा सिंहाचा वाटा आहे.

दरम्यान एकट्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर बनवण्याचे ध्येय वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. यानुसार शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपापल्या स्तरावर कामे केली जात आहे. राज्यात आता वेगवेगळे उद्योग सुरू होत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात पुण्यातील हिंजवडीनंतर आणखी दोन आयटी पार्क विकसित होणार आहेत. पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्क मुळे पुण्याची ओळख आयटी हब म्हणून होऊ लागली आहे.

या ठिकाणी आयटीच्या मोठमोठ्या कंपन्या आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान आता पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे सुद्धा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आयटी पार्क तयार केले जाणार असून पुरंदर नंतर राज्यातील सातारा जिल्ह्यात सुद्धा आयटी पार्क विकसित होणार आहे.

दरम्यान साताऱ्यात विकसित होणाऱ्या आयटी पार्क संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. सातारा जिल्ह्यात तयार होणाऱ्या आयटी पार्क हे महाराष्ट्रातील तिसरे मोठे आयटी पार्क ठरणार आहे.

दरम्यान राज्यातील हे तिसरे मोठे आयटी पार्क विकसित होण्याआधी एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. साताऱ्यातील आयटी पार्क सुरू करण्याआधी एक भव्य ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे.

या ट्रेनिंग सेंटर मध्ये आयटी सेक्टरशी निगडित प्रशिक्षण तरुणांना दिले जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा ट्रेनिंग सेंटरचा प्रकल्प तब्बल 115 कोटी रुपयांचा असून याचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकार दरबारी सादर करण्यात आला आहे.

साताऱ्यात आयटी पार्क उभारण्याआधी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. टाटा टेक्नॉलॉजीज हे सेंटर उभारणार असून याचा प्रस्ताव त्यांनी नुकताच सरकारकडे जमा केला आहे.

कंपनीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहून प्रकल्पाची माहिती देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी मिळालेली आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजच्या सीट्रिपलआयटी म्हणजेच सीआयआयआयटीच्या प्रस्तावामुळे साताऱ्यातील आयटी पार्कला आणखी बळकटी येणार आहे. साताऱ्यात तयार होणारे आयटी‌ पार्क लिंबखिंड नागेवाडी परिसरात उभारले जाईल.

दरम्यान आयटी पार्क आधी टाटा टेक्नॉलॉजी ट्रेनिंग सेंटर सुरू करणार असून कंपनीने केंद्र मंजुरीचे पत्र राज्य शासनाला पाठवले आहे. आता राज्य शासनाकडून येत्या काही दिवसांनी या प्रस्तावाला मंजुरी मिळेल अशी आशा आहे.

यानंतर मग टाटा समूह आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून हे नवीन आयटी ट्रेनिंग सेंटर उभारले जाणार आहे. कर्नाटक तामिळनाडू बिहार आणि आसाम या राज्यांमध्ये टाटा टेक्नॉलॉजी कडून असे ट्रेनिंग सेंटर यशस्वीरित्या उभारण्यात आले असून याचा तेथील नवयुवकांना मोठा लाभ मिळाला आहे.

दरम्यान आता साताऱ्यात सुद्धा याच धरतीवर ट्रेनिंग सेंटर तयार होणार आहे. या ट्रेनिंग सेंटर मध्ये राज्यातील तरुणांना उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक ‌‘एआय‌’ तंत्रज्ञानासह रोजगाराभिमुख कौशल्य विकासाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

कसे असणार ट्रेनिंग सेंटर 

 आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की साताऱ्यात जे ट्रेनिंग सेंटर उभारले जात आहे ते काही पहिलेच ट्रेनिंग सेंटर नाही. राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारचे प्रकल्प आधीच राबविण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या सहकार्याने असे प्रकल्प आधीच यशस्वी झाले असल्याने साताऱ्यातील प्रकल्प सुद्धा यशस्वी होणार अशी आशा आहे. साताऱ्यात उद्योग कौशल्यांसाठीच्या प्रशिक्षणाची उणीव भरून काढण्यासाठी सीआयआयआयटी उभारण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

या आयटी ट्रेनिंग सेंटर मध्ये नवयुवक तरुणांना अत्याधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, सुविधा उन्नतीकरण, अभ्यासक्रम पुनर्रचना व नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षण उपलब्ध होईल अशी माहिती समोर येत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे हे ट्रेनिंग सेंटर सुरू झाल्यानंतर येथे दरवर्षी तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी जो खर्च होणार आहे त्याचा बहुतांशी भाग टाटा टेक्नॉलॉजी उचलणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News