10 एप्रिलपासून कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन धावणार ! कस असणार संपूर्ण वेळापत्रक? वाचा….

कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर समर स्पेशल ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Published on -

Maharashtra Konkan Railway News : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुंबई आणि पुण्यावरून कोकणात प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच अधिक असते. दरवर्षी मार्च आणि एप्रिलच्या दरम्यान मुंबई पुण्यातील चाकरमानी कोकणासह गोव्याकडे जाण्यासाठी गर्दी करत असतात. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जण आपल्या नातलागांकडे तसेच मूळ गावी परतत असतात.

काहीजण या काळात कोकणात आणि गोव्यात पिकनिक साठी जातात. दरम्यान उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत ज्या नागरिकांना मुंबईवरून कोकणात किंवा गोव्याला जायचे असेल त्यांच्यासाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे 10 एप्रिल पासून कोकण रेल्वे मार्गावर एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी दरम्यान चालवले जाणार असून आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ही एक साप्ताहिक गाडी राहणार, म्हणजेच या काळात ही गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. एक 22 डब्यांची समर स्पेशल ट्रेन राहणार असून या गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. या ट्रेनमुळे मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्यांचा प्रवास अगदीच वेगवान होणार आहे.

कसे राहणार समर स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक?

मुंबई येथील सीएसएमटी ते करमाळी दरम्यान चालवली जाणारी स्पेशल ट्रेन 10 एप्रिल ते पाच जून दरम्यान सीएसएमटी वरून रवाना होणार आहे. या काळात ही गाडी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून प्रत्येक गुरुवारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी रवाना होणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता करमळी रेल्वे स्थानकावर अर्थातच गोव्याला पोहोचणार आहे.

करमळी ते सीएसएमटी समरस स्पेशल ट्रेन 10 एप्रिल ते पाच जून दरम्यान चालवली जाणार असून या काळात ही गाडी करमळी रेल्वे स्थानकावरून दर गुरुवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे तीन वाजून 45 मिनिटांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

या गाडीमुळे मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे या समर स्पेशल ट्रेनचा प्रवाशांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe