Maharashtra Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात महायुती सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठमोठे निर्णय घेतललेत. सर्वसामान्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना शिंदे सरकारने सुरू केल्यात. अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच लाडकी बहिण योजना. महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अन महिलांचे कुटुंबात तसेच समाजात स्वतःचे कणखर स्थान निर्माण व्हावे या उद्देशाने सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
सरकारने 28 जून 2024 रोजी या योजनेची सुरुवात केली. प्रत्यक्षात या योजनेचा जुलै महिन्यापासून लाभ दिला जातोय. या अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत.
म्हणजेच ज्यांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळतोय त्यांना आत्तापर्यंत 7500 मिळाले आहेत. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक लाभांमुळे राज्यातील महिला आता स्वयंपूर्ण होऊ लागल्या आहेत. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेचा मोठा फायदा होत आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक लाभांमुळे राज्यातील अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेत.
ही योजना महाराष्ट्रातील तळागाळात पोहोचली आहे. या योजनेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ही योजना विधानसभा निवडणुकीत देखील गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर विरोधकांच्या माध्यमातून सरकारवर टीका करण्यात आली होती. ही योजना जास्त दिवस चालणार नाही अशी अफवा देखील काही लोक पसरवत होते.
तसेच काही लोकांनी या योजनेसाठी सरकार एवढा पैसा कुठून आणणार असाही सवाल उपस्थित केला होता. मात्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेसाठी आधीच 46,000 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. म्हणजेच ही योजना पुढील पाच वर्ष अविरतपणे सुरू राहणार असून त्यापुढेही ही योजना अशीच सुरू राहणार असे वारंवार महायुती मधील जबाबदार नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
यामुळे विरोधकांकडून ज्या अफवा पसरवल्या जात होत्या त्या साफ खोट्या ठरल्या आहेत. विशेष म्हणजे विरोधकांनी या योजनेबाबत वेगवेगळी विधाने देऊनही ही योजना महाराष्ट्रात एवढी लोकप्रिय ठरली आहे की आता महाविकास आघाडीने देखील आपल्या जाहीरनाम्यात अशाच प्रकारच्या योजनेची घोषणा केलेली दिसते.
यामुळे ज्याप्रमाणे मध्यप्रदेश मध्ये लाडकी बहीण योजनेमुळे तेथील विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला जबरदस्त लीड मिळाले तसेच काहीसे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकात पाहायला मिळू शकते असे मत काही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होऊ लागले आहे.
लाडकी बहिण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी ठरली वरदान
मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू झालेल्या शिंदे सरकारच्या या महत्त्वाकांशी योजनेमुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर मदत झाली आहे. महिला आता घराबाहेर पडत आहेत. शिक्षण, स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत. महिन्याला दीड हजार रुपये ही रक्कम काही लोकांना छोटी वाटते मात्र ही रक्कम काही गरीब बांधवांसाठी फारच मोठी असून आत्तापर्यंत मिळालेल्या साडेसात हजार रुपयांच्या रकमेतून राज्यातील अनेक गरीब महिलांनी स्वतःचा व्यवसाय थाटला आहे.
छोट्या मोठ्या व्यवसायांमधून आता महिला आपले घर चालवत आहेत. या योजनेचे पैसे चांगल्या कारणासाठी वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यात एक सांगायचे झाल्यास या योजनेच्या माध्यमातून कित्येक गृहीणींना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झालाय. घर खर्चासाठी आता महिलांना कुणाकडेच मदत मागावी लागत नाही, असे अनेक महिलांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रातील महिला बनल्यात बिजनेसवुमन
लाडकी बहीण योजनेच्या एका लाभार्थी महिलेने या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमधून चक्क स्वतःचा कपड्याचा व्यवसाय सुरू केलाय. या योजनेतून जी साडेसात हजार रुपयांची रक्कम त्या महिलेला मिळाली त्यातूनच तिने स्वतःच्या कपड्याचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे साडेसात हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू केलेल्या या व्यवसायातून तिला 15000 रुपयाचा नफा मिळालाय.
म्हणजेच यातून तिने थेट दुप्पट नफा कमवला असून आता ती महिला आपला व्यवसाय आणखी वाढवण्याच्या तयारीत आहे. ही महिला म्हणते की, माझे स्वतःचे आदित्य क्लाॅथ सेंटर आहे. तिथे मी कपड्यांचा व्यवसाय करते. त्या व्यवसायात मी माझी काही रक्कम आणि लाडकी बहिण योजनेतून जे काही पैसे मला मिळाले ते गुंतवले.
याद्वारे मी साडेसात हजारांचे 15 हजार रुपये म्हणजेच दुप्पट रक्कम केली आहे असे या महिलेने सांगितले. एकंदरीत या योजनेमुळे महिला आता उद्योजक बनत आहेत. शिवाय, किरकोळ कारणांसाठी आता महिला वर्गाला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही, अशा प्रतिक्रीया महिला देत आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातील महिला या योजनेमुळे आत्मनिर्भर बनू लागल्या आहेत.
इस्त्री करणाऱ्या महिलेने खरेदी केली नवीन इस्त्री
इस्त्री काम करणाऱ्या एका महिलेने लाडकी बहिण योजनेच्या पैशातून इस्त्री खरेदी केली आणि स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. यासंदर्भात संबंधित महिला सांगते की, “लाडकी बहिण योजनेतून मी इस्त्री घेतली. ही योजना अशीच पुढे सुरु ठेवावी, लाडक्या भावांकडून आम्हाला अजून काय हवे.”
स्वतःचा कपड्याचा व्यवसाय सुरू करून आणि इस्त्री करणाऱ्या महिलेने नवीन इस्त्री खरेदी करून आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. हे शक्य झाले ते लाडकी बहिण योजनेमुळे. महत्वाचे म्हणजे राज्यात अशा असंख्य महिला आहेत ज्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.