महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ! भारतातील सर्वात लांब बुलेट ट्रेन महाराष्ट्रात; मुंबई-हैद्राबाद मार्गांवर धावणार, कसा राहणार रूट, थांबे, तिकीट दर? वाचा….

Published on -

Maharashtra Longest Bullet Train : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन नंतर मुंबईकरांना आणखी एका बुलेट ट्रेनची सौगात मिळणार आहे. आता मुंबई ते हैदराबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू केली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की देशात हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून एकूण आठ मार्गावर बुलेट ट्रेन सुरू केली जाणार आहे.

यामध्ये मुंबई अहमदाबाद आणि मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन चा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी देखील बुलेट ट्रेन सुरू करण्याचा मानस प्राधिकरणाचा आहे.

दरम्यान मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आमच्या हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे हाय स्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड ने नुकताच सादर केला आहे.

हे पण वाचा :- म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय? अर्ज भरतांना अडचण येतेय मग ‘या’ नंबरवर एक कॉल करा, अडचण होणार चुटकीसरशी दूर

अर्थातच आता रेल्वे मंत्रालय हा अहवाल भारतीय रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी ठेवणार आहे. मग भारतीय रेल्वे बोर्डाने या अहवालास मंजुरी दिल्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम हाती घेतले जाणार आहे. अर्थातच मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प एक पाऊल पुढे सरकला आहे.

मुंबई, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना होणार फायदा

मुंबई पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मुंबई, पुणे, सोलापूर तसेच पंढरपूर येथील नागरिकांना याचा फायदा होणार आहे. ही बुलेट ट्रेन पुणे-सोलापूर मार्गे धावणार असल्याने या परिसराचा विकास सुनिश्चित होणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवाय या बुलेट ट्रेन मुळे पुणे आणि सोलापूर वासियांचा मुंबईकडील आणि हैदराबाद कडील प्रवास सोयीचा होणार आहे. तसेच मुंबईमधील जनतेचा सोलापूर, पुणे, हैद्राबादकडील प्रवास सुसाट होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाहीर; केव्हापासून धावणार, कुठं राहणार थांबा? वाचा…..

कसा आहे मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट

मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट अंतर्गत ७११ किलोमीटरचा मार्ग तयार होणार आहे. या मार्गावरील बुलेट ट्रेन चा वेग 250 ते 320 किलोमीटर प्रति तास राहणार असून यामुळे मुंबई ते हैदराबाद हे अंतर मात्र साडेतीन तासात पार होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील एका बुलेट ट्रेनची प्रवासी क्षमता आहे 750 एवढी राहणार आहे. म्हणजे या मार्गांवर एकावेळी 750 प्रवासी बुलेट ट्रेनने प्रवास करू शकतात.

हे पण वाचा :- दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! सशस्त्र सीमा दलात ‘या’ जागांसाठी निघाली मोठी भरती, आजच करा अर्ज

कुठं राहणार थांबा?

अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार या बुलेट ट्रेन ला या मार्गावरील नवी मुंबई, लोणावळा, पुणे, कुरकंब / दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी (गुलबर्गा), झहीराबाद, हैदराबाद या अतिमहत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.

किती राहणार तिकीट

खरं पाहता भारतीय रेल्वे कडून या संदर्भात कोणतीच माहिती हाती आलेली नाही. मात्र भारतीय रेल्वेच्या माध्यमातून या मार्गावर सुरू असलेल्या सध्याच्या एक्सप्रेस ट्रेनच्या प्रथम श्रेणी एसी भाड्याच्या 1.5 पट तिकीट दर आकारला जाऊ शकतो, असा अंदाज काही मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आला आहे.

हे पण वाचा :- ‘हा’ स्टॉक ठरला शेअर मार्केटचा बादशाह ! ‘इतक्या’ वर्षातच गुंतवणूकदाराचे 60 हजाराचे बनवलेत 10 कोटी, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आली फळाला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe