Maharashtra Metro News : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये वाहतूक सुरळीत व्हावी या अनुषंगाने मेट्रो सुरू करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली असून नागरिकांकडून या शहरांमधील मेट्रोला चांगल्या प्रतिसाद सुद्धा मिळतोये. अशातच आता मुंबई जवळील ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे ठाण्याला लवकरच मेट्रोची भेट मिळणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनचे ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात खरे उतरणार आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवा मेट्रो मार्ग
मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा ते ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली-गायमुख मेट्रो 4 अ मार्गिकेवरील कॅडबरी जंक्शन ते गायमुख या मार्गावर आगामी काळात मेट्रो सुरु होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो चार आणि मेट्रो चार अ या मेट्रो मार्गाच्या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर चाचणी सुरू केली जाणार आहे. येत्या दीड दोन महिन्यांनी या चाचण्या सुरू होतील अशी ही माहिती समोरील आहे.

ऑगस्ट महिन्यात या मार्गावर चाचणी सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे मार्गावरील चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात मेट्रो धावणार आहे. मेट्रो मार्ग चार आणि मेट्रो मार्ग चार अ डिसेंबर 2025 अखेरपर्यंत ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील वाहतूक आणखी वेगवान होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. खरेतर, मेट्रो 4 ही 32.32 किमी लांबीची तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे.
कधीपर्यंत सुरू होणार हा मेट्रो मार्ग
मीडिया रिपोर्टनुसार कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत सर्वसामान्यांच्या सेवेत येऊ शकतो. यानंतरच्या वर्षात म्हणजेच 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा मार्ग सुरू होऊ शकतो आणि या पुढील वर्षात म्हणजेच 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
मेट्रो चार मार्गिके वरील स्थानके
ठाण्यातील या महत्त्वाकांक्षी मेट्रो 4 प्रकल्पांतर्गत 32.32 किमी लांबीची मार्गिका विकसित केली जात आहे तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे. तसेच, या दोन्ही मार्गिकांवर एकूण 32 स्थानके राहणार आहेत.