मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता ‘या’ शहरातही तयार होणार मेट्रोचे जाळे ! 22 स्थानकांचा नवा मेट्रो मार्ग ठरणार गेमचेंजर

अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. हीच वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी ठाण्यात मेट्रोचे जाळे विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. म्हणजे मुंबईपाठोपाठ आता मुंबई नजीक असणाऱ्या महानगरांमध्ये देखील मेट्रोचे जाळे विकसित केले जात असून हे महानगर मुंबई सोबत कनेक्ट करण्याचा अट्टाहास आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Metro News

Maharashtra Metro News : मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता ठाण्यातही मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ठाण्यातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळत आहे. हीच वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी ठाण्यात मेट्रोचे जाळे विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे.

म्हणजे मुंबईपाठोपाठ आता मुंबई नजीक असणाऱ्या महानगरांमध्ये देखील मेट्रोचे जाळे विकसित केले जात असून हे महानगर मुंबई सोबत कनेक्ट करण्याचा अट्टाहास आहे. याचाच एक भाग म्हणून आता ठाणे शहरातही मेट्रो धावणार आहे. त्यामुळं ठाणेकरांचा प्रवास आरामदायी आणि सुकर होणार आहे.

ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे. ठाण्यातील ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प हा शहरातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आता याचं प्रकल्पाबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार ठाण्यातील हा मेट्रो प्रकल्प?

ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प 29 किलोमीटर लांबीचा असून यावर 22 स्थानके विकसित केली जाणार आहेत. या मार्गासाठी सध्या जिओ टेक्निकल इन्वेस्टीगेशन सुरू आहे. या मार्गावरील वीस स्थानके उन्नत राहणार आहेत म्हणजेच जमिनीवर राहणार आहेत आणि उर्वरित दोन स्थानके भूमिगत राहतील.

या मेट्रो मार्गाचा 26 किलोमीटर लांबीचा भाग हा उन्नत राहील आणि उर्वरित तीन किलोमीटर लांबीचा भाग हा भूमिगत राहणार आहे. एक भूमिगत स्थानक थेट ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. तर, अन्य स्थानके मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.

म्हणजेच ठाणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना देखील मेट्रोचा लाभ होईल. हा प्रकल्प आगामी चार वर्षात म्हणजेच 2029 पर्यंत पूर्णत्वास येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पातील आठ किलोमीटरच्या डिझाईनसाठी पाच सल्लागार कंपन्यांकडून प्रस्ताव आले आहेत.

महामेट्रोला एकूण कॉरिडॉरच्या अंदाजे 8 किमीच्या डिझाइनसाठी पाच सल्लागारांकडून प्रस्ताव झाले आहेत. या कंपन्यांमध्ये RITES लिमिटेड, STUP सल्लागार, LKT अभियांत्रिकी सल्लागार आणि दोन फेंच कंपन्यांना भारतीय उपकंपन्या Enia Design आणि Systra MVA Consulting यांचा समावेश आहे.

म्हणजेच या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळू शकणार आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत सुरू झाले तर हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल आणि यामुळे ठाणेकरांना दिलासा मिळेल.

ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा हा प्रकल्प एकूण 22 स्थानकांचा असणार असून यामध्ये रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाजी नगर, नीळकंठ टर्मिनल, गांधी नगर, डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पाटलीपाडा, आझाद नगर बस स्टॉप, मनोरमा नगर, बाळकुम नाका, बाळकुंम पाडा, राबोडी, ठाणे जंक्शन (भूमिगत) आणि नवीन ठाणे या स्थानकांचा समावेश राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe