Maharashtra MIDC Plot : महाराष्ट्रातील 36 पैकी 29 जिल्ह्यांमध्ये प्लॉट खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी ने भूखंड वाटप पुन्हा एकदा सुरू केले आहे. यामुळे जर तुम्हाला एमआयडीसी परिसरात भूखंड खरेदी करायचा असेल एमआयडीसीमध्ये प्लॉट खरेदी करायचा असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.
एमआयडीसी म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 29 जिल्ह्यांमधील विविध औद्योगिक क्षेत्रात वाटपास उपलब्ध असलेले औद्योगिक भूखंड जसे आहेत तसे आणि जिथे आहेत तिथे या तत्त्वावर वाटप केले जाणार अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे.

दरम्यान आता आपण यासंदर्भातील डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. या संबंधित एमआयडीसी परिसरात भूखंड खरेदी करण्यासाठी कसा आणि कुठे अर्ज करावा लागणार यासाठीची मुदत काय आहे याच बाबतची डिटेल माहिती आता आपण पुढे बघणार आहोत.
या तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसीच्या धोरणानुसार, प्रधान्य (Thrust) सेक्टरमध्ये मोडणाऱ्या उद्योगांसाठी भूखंड वाटपासाठी गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात ऑनलाईन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
गेल्या महिन्याच्या 24 तारखेला ही ऑनलाईन निविदा प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली होती आणि ही प्रक्रिया 12 मे पर्यंत सुरू होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतर याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली. उद्योजकांचा प्रतिसाद लक्षात घेता काही निवडक औद्योगिक भूखंडांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 27 मे सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती संबंधितांकडून हाती आली आहे.
साहजिकच या निर्णयामुळे इच्छुक उद्योजकांना अधिक वेळ मिळणार असून, विशेषतः लघु, मध्यम आणि नवउद्योजकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. खरेतर, MIDC च्या प्रधान्य क्षेत्रांत कृषी प्रक्रिया, वैद्यकीय उपकरणे, डेटा सेंटर, इ. क्षेत्रांचा समावेश होतो.
एमआयडीसीमधील भूखंडासाठी अर्ज कुठे करणार?
राज्यभरातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये किती भूखंड उपलब्ध आहेत ? तसेच त्यांची डिटेल माहिती जाणून घेण्यासाठी आणि निविदेसाठी अर्ज सादर करण्यासाठी इच्छुकांना एमआयडीसी ने जारी केलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. www.mahatenders.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती भूखंड उपलब्ध आहेत ?
1)अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये चार आणि नेवासा एमआयडीसी मध्ये एक भूखंड उपलब्ध आहे.
2)पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीच्या टप्पा एक मध्ये एका आणि टप्पा तीन मध्ये दहा भूखंड उपलब्ध आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती एमआयडीसीच्या टप्पा एक मध्ये एक भूखंड उपलब्ध आहे.
3) सांगली जिल्ह्यातील शाळगाव – बोंबाळेवाडी एमआयडीसी मध्ये 16 आणि शिराळा विकास केंद्र एमआयडीसी मध्ये तीन भूखंड उपलब्ध आहेत.
4) सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीमध्ये 1, चिंचोली मध्ये सहा, कुर्डूवाडी मध्ये एक, मंगळवेढा मध्ये एक, बार्शी मध्ये नऊ आणि करमाळा मध्ये तीन भूखंड उपलब्ध आहेत.
5) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील अजंग रावळगाव एमआयडीसी मध्ये नऊ आणि येवला एमआयडीसी मध्ये दोन भूखंड उपलब्ध आहेत.
6) धुळे जिल्ह्यातील नरडाणा टप्पा दोन मध्ये दोन भूखंड उपलब्ध आहेत.
7) नंदुरबार जिल्ह्यातील भालेराव एमआयडीसीमध्ये 17 भूखंड उपलब्ध आहे.
8) जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि चाळीसगाव या दोन्ही एमआयडीसीमध्ये प्रत्येकी चार भूखंड म्हणजेच एकूण आठ भूखंड उपलब्ध आहेत.
9) छत्रपती संभाजी नगर मधील शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसी मध्ये एक भूखंड उपलब्ध आहे.
10) बीड जिल्ह्यातील माजलगाव एमआयडीसी मध्ये सुद्धा एक भूखंड उपलब्ध आहे.
11) धाराशिव जिल्ह्यातील उमरगा एमआयडीसी मध्ये एक भूखंड उपलब्ध आहे.
12) नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर एमआयडीसी मध्ये तीन आणि किनवट मध्ये दोन भूखंड उपलब्ध आहेत.
13) परभणी जिल्ह्यातील जिंतूर मध्ये सात भूखंड उपलब्ध आहेत.
14) अमरावती जिल्ह्यातील अमरावती एमआयडीसी मध्ये 3, अमरावती टेक्सटाईल पार्क मध्ये 10 भूखंड उपलब्ध आहेत. तसेच धारणी लघु, चांदुर रेल्वे लघु, धामणगाव विकास केंद्र एमआयडीसी मध्ये प्रत्येकी एक भूखंड उपलब्ध आहे.
15) यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, दिग्रज आणि पुसद लघु केंद्र एमआयडीसी मध्ये प्रत्येक एक भूखंड उपलब्ध आहेत.
16) अकोला जिल्ह्यातील पातुर एमआयडीसी मध्ये एक भूखंड उपलब्ध आहे.
17) बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी मध्ये तीन भूखंड उपलब्ध आहेत.
18) वाशिम जिल्ह्यातील वाशिम विकास केंद्रात दोन भूखंड उपलब्ध आहेत.
19) नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी मध्ये 9 आणि बुटीबोरी टप्पा क्रमांक दोन मध्ये 11 भूखंड उपलब्ध आहेत.
20) वर्धा जिल्ह्यातील वर्धा एमआयडीसी मध्ये दहा भूखंड उपलब्ध आहेत.
21) गोंदिया जिल्ह्यातील देवरी एमआयडीसी मध्ये चार भूखंड उपलब्ध आहेत.
22) भंडारा जिल्ह्यातील लाखंदर लघु एमआयडीसीमध्ये एक भूखंड उपलब्ध आहे.
23) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर एमआयडीसी मध्ये एक, राजुरा लघु मध्ये दोन आणि चंद्रपूर विकास केंद्रात पाच भूखंड उपलब्ध आहेत.
24) गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा एमआयडीसी मध्ये एक भूखंड उपलब्ध आहे.
25) कोल्हापूर जिल्ह्यातील हलकर्णी एमआयडीसी मध्ये सहा आणि गडहिंग्लज एमआयडीसी मध्ये एक भूखंड उपलब्ध आहे.
26) सातारा जिल्ह्यातील पाटण आणि खंडाळा टप्पा एक मध्य प्रत्येकी एक भूखंड उपलब्ध आहे.
27) कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडाळी एमआयडीसी मध्ये दोन भूखंड उपलब्ध आहेत.
28) रत्नागिरी जिल्ह्यातील गणे – खडपोली एमआयडीसी मध्ये तीन आणि लोटे परशुराम एमआयडीसी मध्ये 19 भूखंड उपलब्ध आहेत.
29) रायगड जिल्ह्यातील विळे – भागड एमआयडीसी मध्ये चार आणि रोहा मध्ये एक भूखंड उपलब्ध आहे.