महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात तयार होणार नवीन बस स्थानक ! 8 कोटी रुपये मंजूर, प्रस्ताव मंजुरीसाठी सादर

Maharashtra New Bus Stand : महाराष्ट्रात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. एसटी महामंडळाची बस ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. राज्यातील कोणत्याही गावात जायचे असले तरीदेखील लाल परीचा प्रवास करून पोहचता येते.

यावरून आपल्याला लाल परीच्या नेटवर्कचा अंदाज बांधत आहे. दरम्यान जर तुम्ही ही एसटीने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे.

प्रवाशांसाठी वेगवेगळ्या बसेस सुरू केल्या जात आहेत सोबतच नवनवीन बसस्थानक सुद्धा विकसित केले जात आहे. अशातच आता राज्यातील एका महत्त्वाच्या शहरात एक नवीन बस स्थानक विकसित होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ येथे नवीन बसस्थानक तयार होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या बसस्थानकाच्या निर्मितीसाठी रेल्वे कडून आठ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. याचा प्रस्ताव दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाकडे जमां झालेला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाले की भुसावळ येथे नवीन बस स्थानक तयार होणार आहे.

कुठे तयार होणार नवीन बस स्थानक

सध्या भुसावळ बस स्थानक जिथे आहे त्यापुढे रेल्वेची जागा आहे आणि त्याच जागेवर नवीन बस स्थानक निर्मितीची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, भुसावळ शहरातील सध्याचे बस स्थानक हे रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडे आहे.

रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वाराला खेटून सध्याचे बस स्थानक उभे आहे. यामुळे ही बस स्थानकाची जागा रेल्वेला हवी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बस स्थानकाच्या जागे ऐवजी परिवहन महामंडळाला रेल्वेची जागा दिली जाणार आहे आणि नवीन बस स्थानक बांधण्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल.

म्हणजे रेल्वेमध्ये आणि परिवहन महामंडळामध्ये जागांची अदलाबदली होणार आहे. भुसावळ बसस्थानकाची जागा रेल्वेला आणि बसस्थानकासमोरील रेल्वेची जागा परिवहन महामंडळाला दिली जाणार आहे.

महत्वाची बाब अशी की, या प्रस्तावाला रेल्वे महाव्यवस्थापकांकडून मंजुरी सुद्धा मिळालेली आहे. आता हा रेल्वे महाव्यवस्थापकांनी मंजूर केलेला प्रस्ताव केंद्रीय मंजुरीसाठी दिल्ली दरबारी पोहोचला आहे.

नवीन बस स्थानकाच्या निर्मितीसाठी आठ कोटींचा निधी 

दरम्यान दिल्ली दरबारी जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर 5,300 चौरस मीटर जागेच्या क्षेत्रफळाचे अदलाबदली होणार आहे. म्हणजेच रेल्वेची पाच हजार तीनशे चौरस मीटरची जागा परिवहन महामंडळाकडे आणि परिवहन महामंडळाची इतकीच जागा रेल्वे कडे येणार आहे.

एवढेच नाही तर या प्रस्तावात रेल्वे प्रशासनाकडून नवीन बस स्थानक उभारणीसाठी परिवहन महामंडळाला पैसे सुद्धा दिले जाणार असा उल्लेख आहे. कारण बस स्थानकाच्या जागेवर ऑलरेडी बस स्थानक आहे आणि रेल्वेची जागा अजून खाली पडलेली आहे.

यामुळे रेल्वे कडून परिवहन महामंडळाला नवीन बस स्थानक तयार करण्यासाठी आठ कोटी रुपये दिले जाणार आहेत. नक्कीच हा प्रस्ताव मान्य झाला तर भुसावळ शहराला नवीन बसस्थानक मिळणार आहे आणि सध्याचे रेल्वे स्थानकाचे आणखी मोठे होणार आहे.