Maharashtra New Bus Station : राज्यात तसेच राज्याबाहेर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ही बातमी पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी येथील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की आता श्रीक्षेत्र आळंदी येथे पीएमपीचे नवीन आगार विकसित केले जाणार आहे.

आळंदी येथे राज्य परिवहन महामंडळाची आठ एकर जागा आहे यापैकी चार एकर जागा पीएमपीला देण्यास नुकतीच मान्यता मिळाली आहे.
खरेतर पीएमपीने याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून एसटी महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठवला होता आणि आता महामंडळाने या पीएमपीच्या प्रस्तावाला नुकतीच मान्यता देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे आता श्रीक्षेत्र आळंदी येथे पीएमपीचे आगार तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एसटी महामंडळाचे चार एकर जागा पीएमपी प्रशासनाच्या ताब्यात लवकरच हस्तांतरित होणार आहे. दरम्यान याच जागेवर पीएमपी प्रशासनाकडून एक भव्य आगार बांधले जाणार असून येथे 80 बसेस थांबू शकतील अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून समोर आली आहे.
खरे तर श्रीक्षेत्र आळंदी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातील वारकरी, भाविक येतात. येथील भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान देशातील आणि देशाबाहेरील येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपी प्रशासनाच्या माध्यमातून येथे आगार बांधण्याचा विचार सुरू होता.
मात्र, पीएमपीला येथे जागा मिळत नव्हती आणि यामुळे पीएमपी प्रशासनाच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडे जागेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
आळंदीत जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे वर्ग झाल्यानंतर आयुक्तांच्या माध्यमातून हा प्रस्ताव एसटी महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आला आणि एसटी महामंडळाने या प्रस्तावाची दखल घेत आता पीएमपी प्रशासनाला आळंदी येथे असणाऱ्या त्यांच्या आठ एकर जागेपैकी चार एकर जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असून आता याच चार एकर जागेवर पीएमपीच्या माध्यमातून नवीन आगार विकसित केले जाणार आहे.
पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे वर्ग केला होता. दरम्यान पंकज देवरे यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांची सुद्धा भेट घेतली होती.
या भेटीदरम्यान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कुसेकर यांनी पीएमपीला जागा देण्याची गोष्ट मान्य केली होती. दरम्यान आता येत्या काही दिवसांनी जागा हस्तांतरणाच्या तांत्रिक बाबी पूर्ण होतील आणि त्यानंतर प्रत्यक्षात जागा पीएमपीच्या ताब्यात येणार आहे.













