15 तासांचा प्रवास फक्त 7 तासात ! समृद्धीनंतर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक 700 किलोमीटरचा महामार्ग, ‘या’ जिल्ह्यांमधून जाणार

महाराष्ट्राला पुन्हा एकदा नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. हा नवा महामार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच विकसित होणार असून या प्रवेश नियंत्रित महामार्गामुळे राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे 15 तासांचा प्रवास फक्त सात तासात पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

Published on -

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर अशा विविध शहरांना आणि जिल्ह्यांना मोठमोठ्या महामार्गांची भेट मिळाली आहे. दरम्यान आता राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर सध्या मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

701 किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा आतापर्यंत 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला असून लवकरच याचा बाकी राहिलेला भाग सुद्धा वाहतुकीसाठी दाखल होणार आहे. समृद्धीचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा पुढील महिन्यात वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

मे च्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्घाटन करतील असे म्हटले जात आहे. अशी परिस्थिती असतानाच आता राज्याला आणखी एका 700 किलोमीटरच्या महामार्गाची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हा नवा महामार्ग पुणे ते बेंगलोर असा विकसित केला जाणार आहे.

हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार असून हा प्रकल्प भारतमाला परीयोजनेच्या दुसऱ्या फेज अंतर्गत विकसित केला जाईल अशी माहिती जाणकारांकडून समोर आली आहे. याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार असून या नव्या एक्सप्रेस वे प्रकल्प मुळे पुणे ते बेंगलोर हा प्रवास वेगवान होणार आहे.

सध्या या दोन्ही शहरादरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना 15 तासांचा वेळ लागतोय मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास कालावधी सात तासांवर येणार आहे. हा महामार्ग प्रकल्प पुणे ते बेंगलोर या दोन्ही शहरादरम्यानचे अंतर 95 किलोमीटरने कमी करणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचणारच आहे

शिवाय इंधनाची सुद्धा मोठी बचत होईल अशी माहिती देण्यात आली असून पुण्यासहित महाराष्ट्रातील पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये एकात्मिक विकासासाठी हा प्रकल्प एक गेमचेंजर प्रकल्प म्हणून ओळखला जाणार आहे. आता आपण या नव्या प्रस्तावित महामार्गाचा रूट तसेच हा मार्ग राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमधून जाणार याची माहिती पाहणार आहोत.

कसा आहे रूट ?

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सातशे किलोमीटर लांबीच्या नव्याने प्रस्तावित पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे बाबत बोलायचं झालं तर हा मार्ग महाराष्ट्रात पुणे रिंग रोडपासून सुरु होईल. कंजळे येथून या महामार्गाची सुरुवात होणार आहे आणि पुढे हा मार्ग पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून जाईल.

म्हणजेच राज्यातील पुणे, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला असून या नव्या महामार्गामुळे या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, कर्नाटकमध्ये हा महामार्ग अथणी तालुक्यातील बोम्मनाळ येथून सुरू होईल आणि कर्नाटक मधील जवळपास 12 जिल्ह्यांमधून हा मार्ग जाणार आहे.

बेळगाव (अथणी), जमखंडी, बागलकोट, बादामी, मुधोळ, नारगुंद, रोन (गडग जिल्हा), येळबुर्गा (कोप्पळ जिल्हा), कुडलगी (विजयनगर जिल्हा), जगलुर (दावणगिरी जिल्हा), मधुगिरी, चित्रदुर्ग तालुका, कोरतागेरे, नेलमंगला, तुमकुर जिल्हा आणि बंगलोर ग्रामीण जिल्हा (डोड्डाबळापूरसह) या कर्नाटकातील महत्त्वाच्या भागातून हा महामार्ग प्रकल्प जाणार असल्याची माहिती जाणकार लोकांकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News