गुड न्यूज ! महाराष्ट्रात तयार होणार 457 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग, पहा संपूर्ण रूटमॅप

Tejas B Shelar
Published:
Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे. याचे कारण म्हणजे देशात अनेक नवीन महामार्गांची उभारणी करण्यात आली आहे. अजूनही अनेक महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत.

एवढेच नाही तर देशातील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत व्हावे यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने भारतमाला परियोजना नामक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.

याअंतर्गत हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार होणार आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील विविध महामार्गाची कामे सुरू आहेत. तसेच काही मार्गांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

यामध्ये मध्य भारताला दक्षिण पूर्व भारताशी जोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या नागपूर ते विजयवाडा या 457 किलोमीटर लांबीच्या महत्त्वकांक्षी महामार्ग प्रकल्पाचा देखील समावेश होतो. दरम्यान, आज आपण याच महामार्गासंदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत.

कसा आहे प्रकल्प ?

या अंतर्गत नागपूर ते विजयवाडा दरम्यान महामार्ग तयार होणार आहे. याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण होईल. याच्या बांधकामासाठी 14 हजार 666 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

विशेष म्हणजे या महामार्गाच्या आखणीला नुकत्याच काही दिवसापूर्वी अंतिम मान्यता प्रदान करण्यात आली असून याचा फायनल डीपीआर देखील तयार झाला आहे.

यामुळे या मार्गाचे लवकरात लवकर भूसंपादन होईल आणि प्रत्यक्षात या मार्गाचे काम सुरू होईल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मार्गाच्या भूसंपादनासाठी अहवाल देखील मागवला जात आहे.

हा मार्ग महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमधून जाणार आहे. अद्याप याचा फायनल डीपीआर ऑनलाइन उपलब्ध झालेला नाही. पण लवकरच हे काम पूर्ण होईल अशी आशा आहे.

महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते विजयवाडा हा प्रवास फक्त आणि फक्त पाच ते सहा तासात पूर्ण होणार आहे. हा महामार्ग 2027 पर्यंत पूर्ण होऊ शकतो.

हा मार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बोडखा, मांडव गोराड चेक मकसुर, वनली, चेक कवडापूर, बोरगाव हिरापूर, लोणार (धोटे), सूमठाणा, पांढरतळा, पाचगाव, आसाळा, बांद्रा, सालोरी – खातोडा, परसोडा जामगाव खुर्द, जामगाव बुद्रुक या गावांमधून जाणार आहे. तसेच भद्रावती तालुक्यातील कोंढा, विजासन, चारगाव कुणाडा या भागातून जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe