महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांदरम्यान तयार होणार 134 किलोमीटर लांबीचा नवीन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वे ! भूसंपादनाची अधिसूचना जारी

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला अखेर मंजुरी मिळाल्याने हा बहुप्रतीक्षित महामार्ग प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. यामुळे नाशिकमधील कृषी बाजारपेठांना आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना मोठा फायदा होईल.

Published on -

Maharashtra New Expressway : पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. पुणे आणि नाशिक यांच्यातील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करण्याच्या दिशेने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. खरेतर या दोन शहरादरम्यान आता एक नवा महामार्ग तयार केला जाणार आहे.

पुणे-नाशिक हरित महामार्ग प्रकल्प तयार केला जाणार असून आता याच प्रकल्पाबाबत नवीन अपडेट हाती आली आहे. या रस्त्यासाठी सरकारने भूसंपादनाची अधिसूचना जारी केली असून, लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला अखेर मंजुरी मिळाल्याने हा बहुप्रतीक्षित महामार्ग प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे 134 किलोमीटर लांबीच्या या हरित महामार्गामुळे प्रवासाचा वेळ दोन ते अडीच तासांनी कमी होणार आहे.

यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. यामुळे नाशिकमधील कृषी बाजारपेठांना आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना मोठा फायदा होईल. नाशिक अन पुणे जिल्ह्याच्या एकात्मिक विकासाला यामुळे चालना मिळणार आहे.

विशेषतः या संबंधित भागातील शेतकऱ्यांसाठी हा महामार्ग फायदेशीर ठरणार असून, शेतीमाल वाहतुकीला वेग येणार आहे. प्रारंभी स्थानिक शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध होता, मात्र राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करून योग्य तोडगा काढला आहे.

या महामार्गासाठी एकूण 1545 हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकल्पासाठी सुमारे 15 हजार 696 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पुणे आणि नाशिकदरम्यानच्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार असून, औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नक्कीच राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय पुणे अन नाशिकमधील जनतेसाठी महत्वाचा ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe