Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात आगामी काळात 498 किलोमीटर लांबीचा एक नवीन एक्सप्रेस वे विकसित होणार आहे. हा प्रस्तावित महामार्ग राज्यातील वाहतूकीला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. समृद्धी महामार्ग प्रमाणेच या महामार्गामुळे देखील महाराष्ट्रात समृद्धी येणार आहे.
या महामार्ग प्रकल्पामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होणार आहे. हा मार्ग राज्यातील तीन जिल्हे जोडणार आहे. यामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरंतर गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे.
अजूनही या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे कोकणातील नागरिकांमध्ये शासनाविरोधात मोठी अनास्था तयार झाली असून सरकार विरोधात सर्वसामान्य नागरिकांची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे.
आता मात्र कोकणातील नागरिकांना सरकारने एक मोठी भेट दिली आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी या दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या 498 km लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झालय.
काल अर्थातच 13 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या महामार्गाचे भूमिपूजन संपन्न झाले. अर्थातच आगामी काळात या महामार्गाचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होईल. या रेवस ते रेडी महामार्गावर सात खाडी पूल तयार होणार असून याच पुलांचे उद्घाटन मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सागरी महामार्गाची रचना कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर करण्यात आलीये. हा सागरी महामार्ग मुंबई गोवा महामार्गाला एक उत्तम पर्याय ठरणार आहे. हा महामार्ग रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना जोडणार आहे.
या महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अति वेगवान होईल अशी आशा आहे. तसेच हा महामार्ग कोकणातील 93 महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांच्या काळात या महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट ठरवण्यात आले असून येत्या काही दिवसात या प्रकल्पाचे काम सुरू झाले तर 2030 पर्यंत हा महामार्ग कोकणवासीयांच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे.
हा महामार्ग सर्वसामान्यांच्या सेवेत आल्यानंतर मुंबई ते गोवा प्रवास सध्याच्या तुलनेत अति जलद आणि सुरक्षित होईल असं बोललं जातंय. यामुळे प्रत्यक्षात या महामार्गाचे काम कधी सुरू होणार आणि नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.