Maharashtra New Railway Line : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रेल्वे मार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वेच्या मोठं-मोठ्या प्रकल्पांमुळे प्रवाशांचा प्रवास हा फारच सुपरफास्ट झाला आहे. दरम्यान राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक महत्त्वाचे आणि अगदीच आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे महाराष्ट्रातील एका बड्या शहरात आणखी एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. खरंतर देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.

यामुळे लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. महत्त्वाची बाब अशी की, शहरातील लोकल प्रवाशांची वाढती संख्या आणि गरज लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून नवनवीन रेल्वे मार्ग, रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जात आहेत.
दरम्यान, आता मुंबईकरांना पनवेलवरुन बोरिवली किंवा विरारपर्यंत थेट लोकल ट्रेनने प्रवास करता येणे शक्य होणार असून यासाठी एका नव्या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पनवेल वरून थेट बोरिवली – विरार पर्यंत प्रवास करता येणे शक्य होईल आणि यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि गतिमान होणार आहे. दरम्यान आज आपण हा नवा प्रकल्प नेमका कसा राहणार याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार नवा प्रकल्प ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या पनवेल येथून बोरिवली किंवा विरारला जाण्यासाठी थेट लोकल ट्रेन उपलब्ध नाहीये. पण नव्या प्रकल्पामुळे पनवेल येथून बोरिवली किंवा विरारला जाण्यासाठी लोकल गाडी उपलब्ध होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी 3 ब मध्ये पनवेल – वसई रेल्वे प्रकल्पाचा समावेश केला आहे. यामुळे पनवेल – वसई लोकल धावल्यानंतर त्याचा विस्तार बोरिवली – विरारपर्यंत करणे शक्य होणार आहे.
यामुळेच हा प्रकल्प मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो असे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे कडून पनवेल – कर्जत हा दुहेरी रेल्वे मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प जवळपास 29.6 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. पनवेल – कर्जत कॉरिडॉर मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कचा एक महत्त्वाचा टप्पा असून हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.
या प्रकल्पाचे काम मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट 3 (एमयूटीपी) अंतर्गत सुरू आहे. या कामासाठी अंदाजे 2 हजार 782 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबईमधील प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान होईल अशी आशा आहे.