महाराष्ट्राला मिळणार 42 हजार कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! महिनाभरात कॅबिनेटची मंजुरी, शिर्डीमधून गडकरींनी केली होती घोषणा

राज्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शिर्डी मधून घोषणा करण्यात आलेल्या एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पाच्या प्रस्तावाला पुन्हा एकदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर राज्याला 42000 कोटीचा एक नवा एक्सप्रेस वे मिळणार आहे.

Published on -

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. येत्या एका महिनाभरात या महामार्ग प्रकल्पाला कॅबिनेटची मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त देखील समोर आली आहे.

खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील साईनगरी शिर्डी येथून या महामार्ग प्रकल्पाची घोषणा केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या या 42000 कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पाचे काम जमिनीच्या भूसंपादना अभावी रखडले होते.

मात्र आता या महामार्ग प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महामार्ग प्रकल्पाला येत्या महिन्याभरात कॅबिनेटची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. स्वतः नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.

गडकरी यांनी असे सांगितले की या महामार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव कॅबिनेटच्या समोर ठेवण्यात आला असून पुढील महिन्यात याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आम्ही ज्या महामार्गाबाबत बोलत आहोत तो आहे सुरत चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे.

या महामार्गाचे काम भारतमाला परीयोजनेच्या माध्यमातून केले जाणार आहे. दरम्यान आता आपण या महामार्ग प्रकल्पाची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे नवा महामार्ग प्रकल्प?

या नव्या महामार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प राज्यातील नाशिक अहिल्यानगर सोलापूर आणि अक्कलकोट या शहरांमधून जाणार आहे. या महामार्गाचा राज्यातील रूट नाशिक-आहिल्यानगर-बीड-धाराशिव-सोलापूर असा राहणार आहे.

सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर-अक्कलकोट-चेन्नई असा या महामार्ग प्रकल्पाचा संपूर्ण रूट असून याची लांबी जवळपास 1600 km इतकी राहणार आहे. या प्रकल्पामुळे सुरत ते चेन्नई हा प्रवास वेगवान होणार असे शिवाय दिल्ली ते चेन्नई या प्रवासाचे अंतर साडेतीनशे किलोमीटर ने कमी होण्याची शक्यता आहे. हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे.

प्रकल्प रद्द झाला होता

हा प्रकल्प जमिनीच्या अधिग्रहणामुळे रद्द करण्यात आला होता. जमीन अधिग्रहणासाठी प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि यामुळे हा प्रकल्प रद्द झाला होता. मात्र आता या प्रकल्पाला पुन्हा एकदा मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असून पुन्हा एकदा हा प्रकल्प कॅबिनेटच्या पुढे आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे गडकरी यांनी येत्या महिन्याभरात या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये बाधित होत आहेत आणि ज्यांचे पैसे अडकलेले आहेत त्यांना ताबडतोब पैसे मिळतील असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रकल्पासाठी 4,231 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून हा एकूण 42 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे नाशिक ते सोलापूर हे अंतर 135 किलोमीटरने, तर सुरत ते चेन्नईचे अंतर 320 किलोमीटरने कमी होणार असा अंदाज आहे.

या महामार्गाची नाशिक जिल्ह्यातील लांबी 122 किलोमीटर इतकी राहणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील याची लांबी 141 km इतकी राहणार आहे. बीड जिल्ह्यातील याची लांबी 38 किलोमीटर आणि धाराशिव जिल्ह्यातील याची लांबी 86 किलोमीटर एवढी राहणार आहे. सोलापूर बाबत बोलायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यात याची लांबी 84 किलोमीटर एवढी असेल. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe