Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील नागरिकांचा 13 तासांचा प्रवासाचा पाच ते सहा तासांवर येणार आहे. हो बरोबर वाचताय आपण राज्यातील प्रवाशांचा 13 तासांचा प्रवास सहा तासांवर येणार, कारण राज्यातील एका बहुचर्चित महामार्गाचे काम आता लवकरच पूर्ण होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.
आम्ही ज्या महामार्ग प्रकल्पाबाबत बोलत आहोत तो प्रकल्प आहे मुंबई गोवा नॅशनल हायवेचा. नॅशनल हायवे 66 म्हणजेच मुंबई गोवा नॅशनल हायवे चे काम केले तेरा वर्षांपासून सुरू आहे. मात्र या महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही.

प्रशासकीय, तांत्रिक अशा वेगवेगळ्या अडचणींमुळे या महामार्गाचे काम गेल्या कित्येक वर्षांपासून अगदीच कासवगतीने सुरू असून आता याच महामार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. हा महामार्ग प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होईल ? या संदर्भात सरकारने विधानसभेत मोठी घोषणा केली आहे.
काय आहेत डिटेल्स ?
मुंबई गोवा नॅशनल हायवे प्रोजेक्ट हा 407 ते 471 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प. या प्रकल्पाच्या कामासाठी आत्तापर्यंत 15 हजार 600 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून गेल्या तेरा वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. पण आता लवकरच हा प्रोजेक्ट सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.
फडणवीस सरकारने सांगितल्याप्रमाणे हा महामार्ग 2025 च्या शेवटी सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार आणि अन्य सदस्यांनी या महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रश्न विचारला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेल्या उत्तरात महामार्गाच्या प्रगतीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार या महामार्गाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. असे झाल्यास मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होणार आहे.
सध्या मुंबई ते गोवा दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करायचं म्हटलं म्हणजे फारच जीवावर येते. कारण की या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल 13 तासांचा वेळ खर्च करावा लागतोय. पण जेव्हा मुंबई गोवा नॅशनल हायवे प्रोजेक्ट सुरू होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी सहा तासांवर येणार आहे.
या महामार्ग प्रकल्पाच्या कामाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पाचे काम एकूण 11 टप्प्यात पूर्ण होत आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे अनेक टप्पे पूर्ण झाले आहेत आणि ज्या टप्प्यांचे काम बाकी आहे ते काम देखील येत्या काही महिन्यांनी पूर्ण होणार आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार या महामार्ग प्रकल्पांतर्गत पनवेल ते कासू (42.3 किमी) या टप्प्यातील मोठे पूल आणि उड्डाणपुलांची कामे मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार आहेत. तसेच कासू ते इंदापूर (42.3 किमी) या टप्प्यातील उर्वरित पूल व उड्डाणपुलांची कामे डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
महत्त्वाची बाब अशी की महामार्गाच्या एकूण 84.60 किमी रस्त्यापैकी 74.80 किमी काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या कशेडी घाटातील बोगद्याचे संपूर्ण काम येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे. कशेडी घाटातील चौपदरीकरणाच्या कामाचा महत्त्वाचा भाग असलेल्या दोन बोगद्यांपैकी एक बोगदा वाहतुकीसाठी आधीच खुला करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या बोगद्याचे अंतिम टप्प्यातील काम सुरू असून, मार्च 2025 च्या शेवटपर्यंत तोही वाहतुकीसाठी खुला करण्याची योजना असल्याचा दावा सरकारने यावेळी केला आहे. यामुळे आता मार्च महिन्याच्या शेवटी कशेडी घाटातील हा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी सुरू होतो का हे पाहणे सुद्धा उत्सुकतेचे राहणार आहे.