महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरादरम्यानचा प्रवास आता फक्त 10 मिनिटात ! महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण

या प्रकल्पांतर्गत बदलापूर ते पनवेल दरम्यान बोगदा विकसित केला जात आहे. हा बोगदा एकूण सव्वा चार किलोमीटर लांबीचा असून नुकतेच याचे काम पूर्ण झाले आहे. हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जात आहे. हा बोगदा 22 मीटर रुंद असून यामध्ये चार मार्गिका तयार होणार आहेत. या बोगद्यामध्ये ठराविक अंतरावर इंटरचेंज देखील तयार केले जाणार आहेत.

Updated on -

Maharashtra New Expressway : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात रस्ते कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर शासनाने आणि प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात शेकडो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांचे काम सुरूच आहे. काही प्रकल्पांचे काम प्रस्तावित आहे तर काही प्रकल्पांचे काम सध्या युद्धपातळीवर केले जात आहे.

बडोदा जेएनपीटी महामार्ग हा देखील असाच एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या सरकारच्या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प संदर्भात नुकतीचं एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. सध्या स्थितीला या प्रकल्पाचे ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात जोरात काम सुरू असून या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण करण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत बदलापूर ते पनवेल दरम्यान बोगदा विकसित केला जात आहे. हा बोगदा एकूण सव्वा चार किलोमीटर लांबीचा असून नुकतेच याचे काम पूर्ण झाले आहे. हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जात आहे.

हा बोगदा 22 मीटर रुंद असून यामध्ये चार मार्गिका तयार होणार आहेत. या बोगद्यामध्ये ठराविक अंतरावर इंटरचेंज देखील तयार केले जाणार आहेत. दोन वर्षात म्हणजेच 24 महिन्यांमध्ये या बोगद्याचे काम पूर्ण होईल असे म्हटले जात होते मात्र प्रत्यक्षात हे काम अवघ्या पंधरा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे.

सध्या या बोगद्याच्या आत मध्ये प्लास्टर केले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याच्या आत मध्ये रस्त्यांचे आणि इतर अन्य महत्त्वाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. या प्रकल्पातील एका महत्त्वाच्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आमदार किसन अधोरे यांनी या कामाची पाहणी केली आहे.

या बोगद्याची पाहणी पूर्ण केल्यानंतर आमदार महोदयांनी या कामासाठी अहोरात्र मेहनत घेत असलेल्या कामगारांचे कौतुक केले आहे. बोगद्याचे काम ठरवून दिलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण झाले असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा संबंधित लोकांचे तोंड भरून कौतुक केले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की बडोदा जेएनपीटी महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या दहा मिनिटात पूर्ण करता येणे शक्य आहे. एवढेच नाही तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात पूर्ण करता येणार आहे.

हा महामार्ग प्रकल्प नवी मुंबई विमानतळाला देखील एक उत्तम कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe