ऐकलंत का मंडळी, मुंबई-पुणे प्रवास दीड तासांनी कमी होणार! तयार होणार नवा महामार्ग, मार्ग अन प्लॅन काय ? वाचा..

राज्यात आगामी काळात एक नवा महामार्ग तयार केला जाणार असून या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवासाचा कालावधी 90 मिनिटांनी अर्थातच दीड तासांनी कमी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता अटल सेतूला जोडणारा एक महामार्ग तयार करण्यात येणार आहे.

Published on -

Maharashtra New Expressway : मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे. राज्यातील सुवर्ण त्रिकोणातील याचं दोन महत्त्वाच्या शहरांमधील नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर मुंबई ते पुणे या दरम्यान दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.

शिक्षण रोजगार व्यवसाय अशा इत्यादी कामानिमित्ताने या दोन्ही शहरात दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या फारच अधिक असून याच नागरिकांच्या सोयीसाठी आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे भविष्यात मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास अति वेगवान होणार असून या निर्णयाचा फायदा या दोन्ही शहरांमधील हजारो नागरिकांना होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

राज्यात आगामी काळात एक नवा महामार्ग तयार केला जाणार असून या नव्या महामार्ग प्रकल्पामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवासाचा कालावधी 90 मिनिटांनी अर्थातच दीड तासांनी कमी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता अटल सेतूला जोडणारा एक महामार्ग तयार करण्यात येणार आहे.

हा महामार्ग थेट पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगलीला जोडला जाणार आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास 90 मिनिटांनी लवकर होणार आहे. खरेतर, सध्या मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात.

मात्र आता या प्रवासाचा कालावधी दीड ते २ तासांनी कमी होणार आहे. सोलापूर आणि साताऱ्याला जोडल्या जाणाऱ्या या एक्सप्रेस वेमुळे हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. आठ लेन असलेल्या या महामार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे.

हा एक्सप्रेस वे महत्त्वाच्या मार्गांना जोडला जाणार असल्याने नागरिकांना या मार्गाचा मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे. हा नवा मार्ग अटल सेतू, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, पुणे, सोलापूर, सातारा इत्यादी महत्त्वाच्या भागांना जोडला जाणार आहे.

म्हणून शहरा शहरांमधील अंतर कमी होणार आहे. या मार्गामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्रातील जिल्हे एकमेकांना जोडले जातील. मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमधील नागरिकांना जलद गतीने मुंबईत जाता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe