Maharashtra New Expressway : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला आहे. मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा आहे.
दुसरीकडे, समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेड पर्यंत विस्तार केला जात आहे. जालना ते नांदेड दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक नवा मार्ग विकसित केला जात आहे. दरम्यान आता याच महामार्ग प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जालना नांदेड समृद्धी महामार्गावर एकूण आठ इंटरचेंज तयार केले जाणार आहेत. दरम्यान आता आपण या महामार्गावर कोणकोणत्या ठिकाणी इंटरचेंज तयार केले जाणार याची माहिती जाणून घेणार आहोत.
या ठिकाणी विकसित होणार इंटरचेंज
जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्प हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग आहे. हा समृद्धी महामार्गाचा एक विस्तारित टप्पा आहे. दरम्यान या प्रवेश नियंत्रित महामार्गावर एकूण आठ ठिकाणी इंटरचेंज विकसित करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आला आहे.
1) समृद्धी महामार्ग आणि जालना देऊळगाव राजा रोड येथे एक इंटरचेंज राहणार आहे. परतुर – वतुर फाटा रोड येथे एक इंटरचेंज राहणार आहे. सेलू – देगाव रोड येथे एक इंटरचेंज राहणार आहे. परभणी – जिंतूर रोड येथे एक इंटरचेंज राहणार आहे.
परभणी – वसमत रोड येथे एक इंटरचेंज राहणार आहे. पूर्णा – चुडावा – नांदेड रोड येथे एक इंटरचेंज राहणार आहे. नांदेड – लातूर रोड येथे एक इंटरचेंज राहणार आहे. देगलूर – नांदेड रोड येथे इंटरचेंज राहणार आहे.
महामार्गाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार
जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहेत. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर याचे काम सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि लवकरात लवकर याचे काम पूर्ण करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या प्रकल्पाचे काम 2028 पर्यंत महामंडळाकडून पूर्ण केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर जालना ते नांदेड हा प्रवास वेगवान होणार आहे. यामुळे मराठवाड्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे.