महाराष्ट्रात तयार होणार आणखी एक नवा महामार्ग ! पश्चिम महाराष्ट्रातील ‘हे’ जिल्हे जोडले जाणार, नवीन आराखडा तयार होणार

गडकरी यांना रोडकरी असे म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे शहरासह जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत दीड लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होणार आहे. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी पुणे सातारा महामार्ग संदर्भात देखील एक नवीन अपडेट दिली आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra New Expressway News

Maharashtra New Expressway News : राज्यासह देशात गेल्या दहा वर्षांच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित झाले आहे. अजूनही अनेक महामार्ग प्रकल्पांची कामे राज्यात युद्ध पातळीवर सुरू आहेत. तसेच काही महामार्ग प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या काळात देशात इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये अधिक डेव्हलपमेंट झाल्याची पाहायला मिळत आहे. मोठमोठाले महामार्ग प्रकल्प पूर्णत्वास गेली आहेत.

त्यामुळे गडकरी यांना रोडकरी असे म्हणूनही ओळखले जाते. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. नितीन गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे शहरासह जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत दीड लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या कामांना सुरुवात होणार आहे.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी पुणे सातारा महामार्ग संदर्भात देखील एक नवीन अपडेट दिली आहे. अनेक वर्ष रखडलेल्या पुणे सातारा महामार्गाची निविदा रद्द केली जाईल आणि या महामार्गासाठी नवीन आराखडा तयार होईल अशी घोषणा गडकरी यांनी केली आहे.

म्हणजेच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला पुणे सातारा महामार्गाचा नवीन विस्तृत आराखडा तयार होऊन याचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. नक्कीच शासनाने पुणे सातारा महामार्ग संदर्भात हा निर्णय घेतला तर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळण्याची आशा आहे.

एनएचएआयमार्फत नाशिक फाटा ते खेड, हडपसर ते यवत, कात्रज बोगदा ते रावेत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे ते शिरूर, पुणे ते छत्रपती संभाजीनगर अशी विविध विकासकामे हाती घेण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

मुंबई-बेंगळुरू हा प्रस्तावित द्रुतगती महामार्ग पुण्याच्या रिंग रोडला जोडला जाईल, अशी देखील घोषणा गडकर यांनी केली आहे. एवढेच नाही तर पालखी महामार्ग हरित मार्ग असावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की 21 सप्टेंबरला एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे विकसित होणाऱ्या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील दिवे घाट-हडपसर चौपदरीकरण; तसेच वारजे-सिंहगड दरम्यान सेवा रस्ते आणि पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले.

कर्वेनगर येथे हा सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. तसेच त्यांनी पांडुरंगाच्या कृपेनेचं मला बारा हजार कोटी रुपयांच्या पालखी महामार्गाचे काम करायला मिळाले अशी प्रतिक्रिया दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe