Maharashtra New Expressway Project : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्याला अनेक महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळाली आहे. विशेषता गेल्या पंधरा ते वीस वर्षांच्या काळात राज्यात रस्त्यांचे नेटवर्क अधिक मजबूत झाल्याचे पाहायला मिळते.
ग्रामीण भागातील रस्ते असोत, राज्य महामार्ग असोत किंवा मग राष्ट्रीय महामार्ग आता सर्वच रस्ते अगदीच हायटेक बनले आहेत. तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही रस्त्यांची कामे सुरूच आहेत. असे असतानाच आता मुंबई शहराला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) वतीने शहरात एक नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. हा एक्सप्रेस वे नवी मुंबई ते बदलापूर दरम्यान तयार होणार आहे. दरम्यान आता याच प्रस्तावित नवी मुंबई-बदलापूर प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवेच्या संदर्भात मोठे अपडेट हाती आली आहे.
या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी चार कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि., रोडिक कन्सल्टन्स प्रा. लि., एसए इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टन्स प्रा. लि., आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि. या चार कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्या आहेत.
खरेतर, या प्रस्तावित एक्सप्रेसवेच्या माध्यमातून दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या जेएनपीटी स्परला विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉरशी जोडण्यात येणार आहे. यामुळे हा महामार्ग फक्त नवी मुंबई ते बदलापूर या दरम्यानचा प्रवास वेगवान करणारा नसून यामुळे दोन महत्त्वाचे महामार्ग सुद्धा एकमेकांना जोडले जाणार आहेत.
हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आलेला मार्ग सुमारे 20 ते 30 किमी लांबीचा असण्याची शक्यता आहे. या जवळपास 30 किलोमीटर लांबीच्या नव्या महामार्ग प्रोजेक्ट मुळे बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवली या परिसराला नवी मुंबईशी थेट आणि जलद जोडणी मिळणार आहे.
परिणामी या परिसरातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. म्हणून आता या नव्या नवी मुंबई बदलापूर एक्सप्रेस वे चा रूट कसा राहणार? याबाबत जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र या महामार्ग प्रकल्पाचा रूट डी पी आर समोर आल्यानंतरच समजू शकणार आहे.