Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. देशात गेल्या दहा वर्षांच्या काळात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्ग विकसित झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत आणि काही प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत.
समृद्धी महामार्गाचे काम देखील गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा असून यापैकी जवळपास 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. या मार्गाचे फक्त 76 किलोमीटर लांबीचे काम शिल्लक राहिले असून याचे कामही जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपुर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता. यानंतर 2023 मध्ये या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला.
2024 उजाडले आणि या महामार्गाचा 25 किलोमीटर लांबीचा भरवीर ते इगतपुरी हा टप्पा सुरू झाला. आता या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुक सेवेत दाखल होणे बाकी आहे.
या महामार्गाचा शेवटचा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकांच्या आधीच सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता. मात्र आता या शेवटच्या टप्प्या संदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितल्याप्रमाणे या महामार्गाचा शेवटचा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्यासाठी डिसेंबर पर्यंत ची वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे या शेवटच्या टप्प्याचे आतापर्यंत 97 टक्के काम पूर्ण झाले आहे. आमने ते वडपे हे चार किलोमीटर लांबीचे काम अजूनही बाकी आहे.
हे चार किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी किमान दोन महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे. येत्या दोन महिन्यात या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण होईल आणि डिसेंबर दरम्यान हा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होईल असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे.
राज्यात पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. यानंतर मग विधानसभेच्या निवडणुका होतील आणि नवीन सरकार येईल. दरम्यान, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच महाराष्ट्रातील हा महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास खूपच जलद होईना आणि यामुळे या दोन्ही शहरात दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.
राज्य रस्ते विकास महामंडळाने या नियोजित वेळेत या टप्प्याचे काम पूर्ण केले सुद्धा. मात्र आमने ते वडपे यादरम्यान चार किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन महिने लागणार आहेत. समृद्धी महामार्ग मुंबई वडोदरा महामार्ग ला देखील जोडला जाणार आहे. यामुळे इगतपुरी ते शांग्रीला रिसॉर्टचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.