Maharashtra New Expressway : 18 तासांचा प्रवास आठ तासात होणार असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण एका महामार्ग प्रकल्पामुळे ही गोष्ट साध्य होणार आहे. नागपूर ते गोवा हा 18 तासांचा प्रवास नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे फक्त आठ तासात पूर्ण होऊ शकतो असा दावा शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून केला जातोय.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या माध्यमातून नागपूर ते गोवा यादरम्यान हा नवीन 801 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. खरंतर गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची चर्चा आहे.

मागील वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत या महामार्गाची सर्वाधिक चर्चा पाहायला मिळाली. या महामार्गाचा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विरोध झाला. परिणामी लोकसभा निवडणुकीनंतर राज्य शासनाने या महामार्गाचे भूसंपादन थांबवले.
महामार्गासाठीची अधिसूचना सुद्धा रद्द करण्यात आली. यामुळे महामार्ग प्रकल्प रद्द होणार असे वाटत होते. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला चांगले यश आले आणि पुन्हा एकदा महायुतीने नागपुर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला.
मात्र, यावेळी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचा रूट चेंज करण्यात आला आहे. याच्या अलाइनमेंट मध्ये आत्तापर्यंतचा सर्वात मोठा बदल करण्यात आलाय.
स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत हिवाळी अधिवेशनात मोठी माहिती दिली आहे आणि आज आपण शक्तिपीठ महामार्गाचे अलाइनमेंट नेमके कसे बदलले आहे? याचाच आढावा घेणार आहोत.
कसे आहे नवीन अलाइनमेंट ?
सीएम फडणवीस यांच्या मते शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्यासाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे. मात्र या महामार्गाच्या अलाइनमेंट मध्ये आता बदल झाला आहे. खरे तर आधीचा प्रस्तावित महामार्ग सोलापूरपासून नागपूर-रत्नागिरी या महामार्गाला समांतर असल्याचा आरोप केला जात होता.
नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना या नव्या महामार्गाची गरज काय असे प्रश्न शेतकरी नेत्यांकडून वारंवार उपस्थित होत होते. त्यामुळे आता सोलापूर पासून या महामार्गाचे अलाइनमेंट बदलण्यात आले आहे.
आता हा. मार्ग सोलापुरातून सांगली आणि पुढे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधून पत्रादेवीला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व परिसरातील नागरिकांनी हा महामार्ग आमच्या भागातून न्यावा अशी मागणी केली होती आणि यासाठी त्यांनी मोर्चा सुद्धा काढला होता.
त्यांनी त्यांच्या मागणीचे पत्र सरकारकडे जमा केले होते आणि याचे दखल घेत आता सरकारने चंदगड भागातून हा महामार्ग प्रस्तावित केला. या महामार्गामुळे एकूण 32 जिल्ह्यांना कनेक्टिव्हिटी मिळणार असा मोठा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.
या प्रकल्पामुळे नागपूर गोवा अठरा तासांचा प्रवास फक्त आठ तासांमध्ये पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या महामार्गाचे काम 2026 पासून सुरू होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.













