महाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित महामार्गाचे गुढीपाडव्याला उद्घाटन !

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा शहात्तर किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा आता सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होईल अशी बातमी प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे.

Published on -

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाची भेट मिळणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रकल्प असून आत्तापर्यंत या महामार्ग प्रकल्पाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून सध्या यावर वाहतूक सुद्धा सुरू आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन डिसेंबर 2022 मध्ये झाले होते. डिसेंबर 2022 मध्ये या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला होता. यानंतर, 2023 मध्ये या महामार्गाचा 80 किलोमीटर लांबीचा शिर्डी ते भरवीर हा तपास सुरू झाला.

पुढे 2024 मध्ये या महामार्गाचा भरभर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आणि अशा तऱ्हेने आतापर्यंत या महामार्ग प्रकल्पाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.

आता या महामार्ग प्रकल्पाचा शेवटचा टप्पा देखील उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होणार आहे. इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार असल्याची बातमी समोर आली आहे.

इगतपुरी ते आमने हा शहात्तर किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हा संपूर्ण प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास अवघ्या आठ तासात पूर्ण होणार आहे.

पण मराठी नववर्षात समृद्धी महामार्गावरील प्रवास महागणार आहे. एक एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरील टोल दरांत वाढ होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

नव्या आर्थिक वर्षात या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी हलक्या वाहनांसाठी टोल दर 2 रुपये 6 पैसे, मध्यम वाहनांसाठी 3 रुपये 32 पैसे, मोठ्या वाहनांसाठी 6 रुपये 97 पैसे आणि ट्रेलरसाठी 10 रुपये 93 पैसे असे लागू करण्यात आले आहेत.

2022 मध्ये महामार्ग सुरू झाल्यानंतर हलक्या वाहनांसाठी टोल दर 1 रुपये 73 पैसे होता. त्यात आता 33 पैशांची वाढ झाली असून प्रवास सुमारे 19 टक्क्यांनी महागणार आहे. सध्या नागपूर ते इगतपुरी हा मार्ग सुरू आहे, तर इगतपुरी ते ठाणे हा टप्पा आता सुरू होणार आहे. यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला आहे.

हा महामार्ग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असून, या महामार्गाचे काम 2014 मध्ये ते मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आले होते.

दरम्यान आता ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत आणि या महामार्ग प्रकल्पाचे काम सुद्धा शंभर टक्के पूर्ण झाले आहे आणि उद्या अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी या महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या महामार्ग प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या दिवशी होणार का? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe