Maharashtra New Expressway : कॅलिफोर्नियाच्या भरतीवर आपल्या महाराष्ट्रात एक नवीन हायटेक महामार्ग विकसित केला जाणार आहे. या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. रेवस ते रेडी दरम्यान नवीन मार्ग तयार होणार असून हा महामार्ग मुंबई गोवा महामार्गाला पर्याय ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यातील रेवस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी यादरम्यान हा नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या महामार्ग प्रकल्पाला आधीच मंजुरी मिळाली असून आज अर्थातच 13 ऑक्टोबर 2024 रोजी या महामार्गाचे भूमिपूजन नियोजित आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या महामार्गाचे भूमिपूजन करणार आहेत. हा महामार्ग कॅलिफोर्निया देशात असणाऱ्या एक्सप्रेस वे च्या धर्तीवर तयार होत असून यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास हा वेगवान होणार आहे. मुंबई ते गोवा यातील प्रवासाचे अंतर आणि प्रवासाचा वेळ सुद्धा या महामार्गाने कमी होणार आहे.
यामुळे कोकणाच्या एकात्मिक विकासाला नक्कीच गती मिळण्याची शक्यता आहे. आज या महामार्गाचे भूमिपूजन होणार असल्याने आज आपण हा महामार्ग प्रकल्प नेमका कसा आहे? यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार हा महामार्ग ?
वस ते रेड्डी दरम्यान कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर सागरी किनारा महामार्ग विकसित होणार आहे. या महामार्गाची लांबी ही 498 किलोमीटर एवढी राहणार आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
या महामार्गावर सात नवीन पूल तयार होणार असून याचे भूमिपूजन होणार आहे. या पुलांची लांबी ही 26.70 किलोमीटर एवढी राहणार आहे. यासाठी 7851 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता सुद्धा देण्यात आली आहे.
हा महामार्ग दक्षिण कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना म्हणजेच रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणार आहे. मुंबईकरांना थेट गोव्याला जाता यावे यासाठी हा महामार्ग फायद्याचा राहणार आहे. समुद्राकिनाऱ्यालगत हा महामार्ग तयार होणार असल्याने याचा फायदा पर्यटनाला सर्वाधिक होणार आहे.
हा रस्ता कोकणातील 93 महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना जोडणी देणार आहे. या महामार्गाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर पुढील पाच वर्षात याचे काम पूर्ण होणार आहे. अर्थातच 2030 पर्यंत या महामार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. या महामार्ग प्रकल्प अंतर्गत कोकणात सात खाडी पूल तयार केले जाणार आहेत.