महाराष्ट्रात तयार होणार नवीन Expressway ! 30 किलोमीटरसाठी 6,000 कोटी रुपयांचा खर्च, कसा असणार रूट ?

Published on -

Maharashtra New Highway : कोणत्याही राष्ट्राचा, राज्याचा विकास तेथील दळणवळणावर अवलंबून असतो. दळणवळणात रस्ते व रेल्वेचे नेटवर्क मोठी भूमिका निभावत असते. त्यामुळे शासनाकडून गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यांचे तसेच रेल्वेचे मोठ-मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात आली आहेत.

अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. दरम्यान आता राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. हा नवीन महामार्ग समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. खरे तर समृद्धी महामार्ग नागपूरहून आमने पर्यंत आहे.

पण आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण साकेत – आमने बीच असा नवा मार्ग तयार करणार आहे. याचा आराखडा सुद्धा तयार करण्यात आलाय. हा 29.3 किलोमीटर लांबीचा रस्ता असेल. यासाठी 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच हा प्रकल्प इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन (EPC) मॉडेलवर पूर्ण केला जाईल.

म्हणजेच संपूर्ण आराखडा, बांधकाम आणि तांत्रिक जबाबदारी निवडलेल्या ठेकेदाराकडेच राहणार आहे. हा प्रकल्प समृद्धी महामार्गावरून उतरलेल्या वाहनांना ट्रॅफिकविना थेट मुंबईकडे घेऊन जाईल. यामुळे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. आमनेहुन साकेतला जुन्या मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागते.

यामुळे नागरिकांना 29 किलोमीटरच्या प्रवासासाठी दोन तास लागतात. कोंडीमुळे अधिक वेळ खर्ची होतो. यावर रामबाण उपाय म्हणून हा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय झाला आहे. नव्या प्रस्तावित एलिवेटेड रस्त्यामुळे दोन तासांचा प्रवास काही मिनिटांवर येणार आहे.

तसेच हा मार्ग थेट ईस्टर्न एक्स्प्रेस फ्री-वेला जोडला जाईल. ईस्टर्न फ्री-वे विस्तारासोबत पण याची कनेक्टिव्हिटी राहणार आहे. अर्थात याने दक्षिण मुंबईत जाणे आणखी सोपे होईल.

मुंबईहून नाशिक, शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा मिळेल. आता एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया सुरू केलीये. यामुळे लवकरच याच्या कामाला गती मिळणार अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe