Maharashtra New Highway : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई पुणे नागपूर ठाणे नाशिक सहित राज्यातील अनेक शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान आता राज्यातील जनतेला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणेकरांना नवीन सहा पदरी महामार्ग मिळणार असून या रस्त्यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे. या नव्या रस्ते विकासाच्या प्रकल्पामुळे पुण्याहून सोलापूर कडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडी मुक्त प्रवास करता येणार आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 25 किलोमीटर लांबीचा नवा महामार्ग विकसित केला जाणार असून या महामार्ग प्रकल्पाला नुकतीच राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. अशा परिस्थितीत आता आपण हा नव्याने विकसित होणारा महामार्ग प्रकल्प नेमका कसा आहे याबाबत माहिती पाहणार आहोत.
कसा आहे नवा मार्ग ?
पुण्यातून सोलापूर कडे जाणाऱ्या लोकांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग विकसित होणार आहे. हा मार्ग हडपसर ते यवत दरम्यान विकसित होणार असून या प्रकल्पाला राज्य शासनाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. खरे तर या भागात होणारी वाहतूक कोंडी ही सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढवणारी आहे.
यामुळे या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवा उन्नत मार्ग विकसित करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला असून या जवळपास 5300 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला राज्य शासनाचे नुकतीच मंजुरी सुद्धा मिळाली आहे. जाणकार लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता आणि हा प्रस्ताव विभागाच्या पायाभूत विकास महामंडळाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला.
दरम्यान या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली आणि अखेरकार त्याला या बैठकीत दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 29 एप्रिल 2025 रोजी मंगळवारी मान्यता देण्यात आली. खरे तर हा एक सहापदरी उन्नत मार्ग राहणार असून हा प्रकल्प बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय झालेला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हडपसरहून सासवडकडे जाणाऱ्या उड्डाणपुलापासून 25 किलोमीटर अंतरावरील सहापदरी उन्नत मार्गाचे काम महामंडळाकडून केले जाणार आहे. दरम्यान या उन्नत मार्गामुळे या भागातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येणार असून प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता येणे शक्य होईल.
प्रवाशांच्या जलद सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी हा प्रकल्प फारच महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी आगामी काळात निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार असल्याची माहिती जाणकार लोकांकडून समोर आली आहे.