Maharashtra New Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. खरंतर मराठवाड्यातून साईनगरी शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. यासोबतच तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील अधिक आहे.
दरम्यान मराठवाड्यातील शिर्डी आणि तिरुपती बालाजी ला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेकडून आता शिर्डी ते तिरुपती बालाजी अशी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली असून या नव्या गाडीमुळे या मार्गावरील भाविकांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

या गाडीचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर कर्नाटक आणि तेलंगाना राज्यातील भाविकांना मोठा लाभ मिळणार आहे. तिरुपती ते साईनगर शिर्डी या मार्गावर पहिल्यांदा 9 डिसेंबर 2025 रोजी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली असून ही गाडी 14 डिसेंबर 2025 पासून नियमित धावणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून समोर आली आहे.
9 डिसेंबर रोजी या गाडीचे उद्घाटन करण्यात आले. आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी नवी दिल्लीतील रेल भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे.
दरम्यान आजपासून ही गाडी नेहमी धावणारा असून या गाडीमुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील भाविकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. या नव्या एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील जवळपास 31 महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार आहे. ही एक साप्ताहिक गाडी आहे म्हणजेच आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. त्या गाडीला या मार्गावरील 31 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
ह्या गाडीला छत्रपती संभाजीनगर, नेल्लोर, गुंटूर, सिकंदराबाद, बिदर, मनमाड अशा रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. विशेष बाब अशी की ही गाडी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या परळी वैजनाथ येथे सुद्धा थांबा घेणार आहे. यामुळे परळी वैजनाथ येथे जाणाऱ्या भाविकांना देखील ही गाडी फायद्याची ठरणार आहे.
शिर्डी दर्शनानंतर परळी वैजनाथ येथे जाणाऱ्या भाविकांसाठी किंवा परळी वैजनाथ येथून दर्शन घेतल्यानंतर शिर्डीला जाणाऱ्या तसेच तिरुपती कडे जाणाऱ्या भाविकांना या रेल्वे गाडीचा लाभ होणार आहे. महत्वाची बाब अशी की या गाडीत छत्रपती संभाजी नगरकरांसाठी 40 ते 45 लोकांचा कोटा मंजूर केला जाऊ शकतो.
गाडीचे वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर दर रविवारी ही गाडी तिरुपती येथून सकाळी चार वाजेच्या सुमारास सोडली जाणार आहे आणि सोमवारी सकाळी सव्वासहा वाजता छत्रपती संभाजी नगर येथे आणि सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास ही गाडी साईनगर शिर्डी येथे पोहोचणार आहे.
ही साप्ताहिक गाडी नियमित धावणार आहे. साहजिकच या नियमित गाडीचा भाविकांना मोठा लाभ मिळणार आहे. पण त्याचवेळी रेल्वे प्रशासनाने तिरुपती ते शिर्डी दरम्यान सुरू असणाऱ्या विशेष गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. या निर्णयाचा अनेक भाविकांना फटका बसला असून त्यांची नियोजित यात्रा यांमुळे पूर्णपणे खराब झाली आहे.













