Maharashtra New Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अधिक खास ठरणार आहे. कारण की आगामी काळात मुंबई ते पुणे हा रेल्वे प्रवास आणखी वेगवान होणार आहे.
यासाठी राज्यात एका नव्या रेल्वे मार्गाची निर्मिती होणार असून याच नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या संदर्भात आता एक नवीन माहिती हाती आली आहे. मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद आणि सुरळीत व्हावा यासाठी मध्य रेल्वेने कर्जत-लोणावळा दरम्यान दुहेरी मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाची बाब अशी की, यासाठी दोन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले असून, ते प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर सुद्धा करण्यात आले आहेत.
दरम्यान आता रेल्वे बोर्ड या प्रस्तावापैकी कोणता प्रस्ताव मंजूर करणार? आणि याबाबतचा प्रस्ताव कधीपर्यंत मंजूर होऊ शकतो? हे जाणून घेणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे. दरम्यान आता आपण हा नवा रेल्वे मार्ग प्रकल्प नेमका कसा असेल याचा संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
कसा असणार नवा रेल्वे मार्ग प्रकल्प?
मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वे मार्ग प्रकल्पात भुयारी बोगदे, पूल आणि काही ठिकाणी स्वतंत्र मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत. हा जो नवीन मार्ग विकसित होणार आहे तो सध्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट लांबीचा असेल.
या नव्या मार्गात चढ-उतार नसल्यानं रेल्वेला बँकर इंजिनची गरज भासणार नाही. यामुळेच कर्जत ते लोणावळा दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. साहजिकच यामुळे मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास सुद्धा वेगवान होईल.
या नव्या रेल्वे मार्गामुळे बँकर जोडण्या-काढण्याचा 20-20मिनिटांचा वेळ वाचणार आहे. म्हणजेच या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे असा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान, या मार्गावर नवी स्थानके सुद्धा उभारण्यात येणार असून, या संबंधित भागातील परिसराच्या विकासाला सुद्धा मोठी गती मिळणार आहे.
आता या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. तथापि, या नव्या मार्गाचे काम नेमके कधीपर्यंत सुरू होणार? हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे राहणार आहे.