Maharashtra New Railway : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. अशातच आता राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आणखी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या शहराला आणखी एक नव्या रेल्वेस्थानकाची भेट मिळणार आहे. याशिवाय एक नवा रेल्वे मार्ग सुद्धा विकसित होणार आहे.
या नव्या रेल्वेस्थानकामुळे अन रेल्वे मार्गामुळे बदलापूरकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. यामुळे आजची ही बातमी बदलापूरवासियांसाठी दिलासादायक बातमी राहणार आहे. दरम्यान आता आपण कोणत्या भागात हे नवीन रेल्वे स्थानक विकसित होणार आणि नवा रेल्वे मार्ग कसा राहणार ? याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत.

कुठं तयार होणार नवं रेल्वे स्थानक ?
मिळालेल्या माहितीनुसार, वांगणी आणि बदलापूर स्थानकांदरम्यान नवीन रेल्वे स्टेशन विकसित केले जाणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर कासगाव या ठिकाणी हे नवीन रेल्वे स्थानक विकसित होणार असून नव्या रेल्वे स्थानकाच्या सर्वेक्षणाला मध्य रेल्वेने मंजुरी सुद्धा दिली आहे.
महत्त्वाचे म्हणजे एक नवीन रेल्वे मार्ग सुद्धा विकसित होणार असून हा रेल्वे मार्ग नव्याने विकसितो होणाऱ्या कासगाव या स्थानकातून मोरबे–कामोठे–मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग तयार होणार आहे. यामुळे आगामी काळात बदलापूरकरांचा प्रवास फारच सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.
मध्य रेल्वेमार्गांवर प्रस्तावित करण्यात आलेल्या नव्या रेल्वे स्थानकामुळे आणि नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूर ते नवी मुंबई प्रवास अवघ्या 30 मिनिटांत शक्य होणार असा अंदाज रेल्वे प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. खरेतर, बदलापूर शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि लोकलवरील ताण लक्षात घेता, हा प्रकल्प बदलापूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे शहराच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार असून नागरिकांना आणखी चांगली रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या पुढाकारातून या दोन्ही रेल्वे प्रकल्पांचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला होता.
पातकर यांनी यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे प्रशासन यांच्याकडे जोरदार पाठपुरावा केला होता. याच पाठपुराव्यामुळे आता नवा रेल्वे मार्ग तयार होणार आहे तसेच नवीन रेल्वे स्थानक सुद्धा विकसित होणार आहे.
कसा असणार रेल्वे मार्गाचा रूट ?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मध्य रेल्वे मार्गावर नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या कासगाव या स्थानकातून मोरबे–कामोठे–मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग तयार होणार आहे. या नवीन मार्गामुळे कासगाव ते कामोठे यादरम्यानचे अंतर फक्त आणि फक्त पंधरा मिनिटांत पार करता येणार आहे.
तसेच, या मार्गामुळे नवी मुंबई एअरपोर्टशीही थेट जोडणी मिळणार आहे. नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे संपूर्ण परिसराचा एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे.
पण, आता या सर्वेक्षणानंतर प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. पण, या प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याने येत्या काळात हा प्रकल्प 100% पूर्ण होणार आणि बदलापूरकरांना दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.