Maharashtra New Railway Line : रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. बस प्रमाणेच आपल्या राज्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची देखील संख्या फारच उल्लेखनीय आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत अर्थातच मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेने अर्थातच लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. लोकलला मुंबईची जीवीत वाहिनी म्हणून ओळखली जाते.
सध्या मुंबई शहरात आणि उपनगरात उपनगरीय रेल्वेचे मोठे नेटवर्क अस्तित्वात आहे. याशिवाय, अजूनही लोकलचे रेल्वे नेटवर्क वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता मुंबई महानगर प्रदेशात आणखी एक नवा रेल्वे मार्ग तयार होणार असल्याची बातमी समोर आली आहे. पनवेल ते कर्जत दरम्यान लोकल कॉरिडॉर विकसित केला जात असून याच प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काय आहेत डिटेल्स ?
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल कर्जत लोकल कॉरिडोरचे आत्तापर्यंत 70% इतके काम पूर्ण झाले असून उर्वरित 30 टक्के काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कॉरिडॉरचे बाकी राहिलेले काम येत्या काही महिन्यांनी पूर्ण होणार आहे.
अशातच आता या मार्गावर विकसित होत असणाऱ्या महापे रेल्वे स्थानकात पहिला एंड अनलोडिंग रेक (ईयूआर रेक) दाखल झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (MRVC) च्या माध्यमातून पूर्ण केले जात असून हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला झाल्यानंतर पनवेल ते कर्जत दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.
या भागातील नागरिकांना या मार्गामुळे वाहतुकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. या कॉरिडॉरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पनवेल वरून कर्जत ला जाण्यासाठी आता कोणती ट्रेन बदलण्याची गरज नाही. म्हणजेच पनवेल ते कर्जत असा थेट प्रवास आता या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे.
दरम्यान आता प्रकल्पासाठीचा पहिला एंड अनलोडिंग रेक (EUR) साईटवर पोहचला आहे. लवकरच कर्जत आणि चौक स्थानकांदरम्यान ट्रॅक टाकण्याचे काम सुद्धा सुरू होईल. दरम्यान या प्रकल्पात जे रेल्वेवापरले जाणार आहेत ते पॅनल स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या माध्यमातून तयार केले जात आहेत.
पनवेल कर्जत कॉरिडॉर हा जवळपास 30 किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गाची एक्झॅक्ट लांबी ही 29.6 किलोमीटर एवढी आहे. या मार्गावर एकूण पाच स्थानके तयार होणार आहेत.
किती स्थानके विकसित होणार?
या मार्गावर पनवेल, चिखले, महोपे, चौक आणि कर्जत अशी 5 स्थानके राहणार आहेत. या रेल्वे मार्गासाठी 47 पूल बांधले जात आहेत. त्यापैकी 29 लहान आणि 6 मोठे पूल पूर्ण झाले आहेत. बाकी राहिलेल्या पूलांचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. महोपे आणि किरवली दरम्यान 4 रोड ओव्हर ब्रिज (ROB) देखील बांधण्यात आले आहेत.
डिसेंबर 2025 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे काम नियोजीत वेळेस पूर्ण झाल्यास 2026 मध्ये या मार्गावर लोकल धावताना दिसणार आहे. या प्रकल्पाच्या किमती बाबत बोलायचं झालं तर हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्रदेशातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प 2,782 कोटींचा आहे.