महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरादरम्यान विकसित होणार नवा रेल्वे मार्ग ! रेल्वे मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील सरकारकडून राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी हजारो करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच फडणवीस यांनी विदर्भातील एका महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला असल्याची माहिती सुद्धा दिली आहे.

Published on -

Maharashtra New Railway Line : महाराष्ट्रातील विदर्भ विभागासाठी एक मोठी दिलासादायक आणि फारच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे विदर्भातील नागरिकांसाठी एक नवा रेल्वे मार्ग विकसित होणार असून या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाचा ग्रीन सिग्नल सुद्धा मिळाला आहे.

दरम्यान याच नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील गोंदिया–बल्लारशा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले आहे.

फडणवीस काय म्हटले ?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, विदर्भातील गोंदिया-बल्लारशा या महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी 4 हजार 819 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकल्पाबाबत पुढे बोलताना त्यांनी असे म्हटले की, हा प्रकल्प विदर्भातील रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवणार असून यामुळे विदर्भातील जनतेचा प्रवास वेगवान होणार आहे. छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेशाला गोंदियामार्गे जोडत हा मार्ग विदर्भातील व्यापार व संपर्क आणखी सुलभ करणार आहे.

दरम्यान, या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्राकडून भरीव निधी उपलब्ध झाला असल्याने आणि या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने सीएम फडणवीस यांनी यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार सुद्धा मानले आहेत.

महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी रेल्वे विकासाच्या अनेक व्यापक योजनांचा उल्लेख केला. ते म्हणालेत की, केंद्र सरकार रेल्वे पायाभूत सुविधांसाठी 1.73 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 132 रेल्वेस्थानकांचे पुनर्विकासाचे लक्ष्य सुद्धा ठेवण्यात आले आहे.

यामुळे या संबंधित रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगामी काळात दिलासा मिळणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास झाल्यास राज्याचे रेल्वे नेटवर्क आणखी स्ट्रॉंग होणार आहे.

यामुळे रेल्वेचा प्रवास आणखी सोयीचा होईल अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यातील रेल्वेच्या प्रकल्पांसाठी केंद्रातील सरकारकडून यावेळी अर्थसंकल्पात 23 हजार 700 कोटींची तरतूद करण्यात आली असून, ही रक्कम मागील यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या 10 हजार कोटींच्या तुलनेत दुप्पट आहे.

दरम्यान राज्यातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी सरकारकडून चांगला निधी उपलब्ध होत असल्याने हे प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होतील आणि या उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक वारसा आणखी वाढणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News