महाराष्ट्राला मिळणार 110 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणार, कसा असणार रूट ? वाचा..

या प्रकल्पामुळे धाराशिव ते सोलापूर हा प्रवास जलद होणार आहे. हा मार्ग तुळजापूर मार्गे जाणार आहे. यामुळे तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख देवस्थान रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे धाराशिव हे रेल्वे जंक्शन बनणार आहे. तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra New Railway Line

Maharashtra New Railway Line : गेल्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्रात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्याकडे शासनाने विशेष लक्ष दिले आहे. या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळ्या महामार्गांची आणि नवनवीन रेल्वे मार्गांची उभारणी केली जात आहे. अशातच आता महाराष्ट्रासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राला एका नवीन रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे.

काल अर्थातच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील एका प्रस्तावित रेल्वे मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामुळे येत्या काही दिवसांनी या रेल्वे मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. धाराशिव ते सोलापूर असा हा रेल्वे मार्ग राहणार आहे.

या प्रकल्पामुळे धाराशिव ते सोलापूर हा प्रवास जलद होणार आहे. हा मार्ग तुळजापूर मार्गे जाणार आहे. यामुळे तुळजापूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख देवस्थान रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे धाराशिव हे रेल्वे जंक्शन बनणार आहे.

तुळजापूर हे रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. यामुळे तुळजापूर या देवस्थानाचा विकास होऊ शकणार आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील कृषी, शिक्षण, पर्यटन, उद्योग अशा विविध क्षेत्रांना फायदा होणार आहे.

तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ. या तीर्थक्षेत्राला भेटी देण्यासाठी देशभरातील भाविक येथे दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी करत असतात.

सणासुदीच्या काळामध्ये प्रामुख्याने नवरात्र उत्सवात तुळजापूरला येणाऱ्यांची संख्या आणखी वाढत असते. मात्र अजून पर्यंत तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर नाही.

पण आता हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. काल तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंग पाटील यांनी या रेल्वेमार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. दरम्यान आता आपण हा रेल्वे मार्ग कसा राहिल या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

कसा असणार प्रकल्प?

मराठवाड्यातील धाराशिव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या दरम्यान हा रेल्वे मार्ग तयार होणार आहे. हा मार्ग तुळजापूर मधून जाणार आहे. या रेल्वे मार्गाची लांबी 84.44 किलोमीटर एवढी राहणार आहे. हा प्रकल्प एकूण तीन टप्प्याचा राहणार आहे. या मार्गावर एकूण 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल विकसित केले जाणार आहेत.

या प्रकल्पामुळे मुंबई, पुण्यासह संपूर्ण देशभरातील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेमुळे हे तीर्थक्षेत्र वेगाने विकसित होणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे दोन्ही विभाग या प्रकल्पामुळे परस्परांना जोडले जाणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe