महाराष्ट्रातील 100 वर्ष पेक्षा अधिक काळ रखडलेला ‘हा’ Railway मार्ग प्रकल्प आता 45 दिवसात मार्गी लागणार ! सर्व्हे पण झाला सुरू, कसा आहे रूट?

रेल्वे बाबत बोलायचं झालं तर भारतातील रेल्वे नेटवर्क हे फारच मोठे आहे. भारतातील कोणत्याही शहरात जायचे असले तर रेल्वे सहज उपलब्ध होते. याशिवाय रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणार असतो. यामुळे सर्वसामान्य नागरिक रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. दरम्यान महाराष्ट्रात अशीच एक रेल्वे लाईन तयार होणार आहे जी गेल्या शंभर वर्षांपासून रखडली आहे.

Published on -

Maharashtra New Railway Line Project : महाराष्ट्रासहित संपूर्ण भारतात रस्ते आणि रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. दरम्यान सरकारकडून गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्याच्या आणि रेल्वेचे नेटवर्क विस्तारण्याचा प्रयत्न सुरू आहे. रेल्वे बाबत बोलायचं झालं तर भारतातील रेल्वे नेटवर्क हे फारच मोठे आहे. भारतातील कोणत्याही शहरात जायचे असले तर रेल्वे सहज उपलब्ध होते.

याशिवाय रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणार असतो. यामुळे सर्वसामान्य नागरिक रेल्वेने प्रवास करण्यास पसंती दाखवतात. मात्र राज्यात असेही काही भाग आहेत जे अजूनही रेल्वे नेटवर्क सोबत जोडले गेलेले नाहीत. दरम्यान अशा भागांना रेल्वेने जोडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी नवनवीन रेल्वे लाईन तयार केल्या जात आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात अशीच एक रेल्वे लाईन तयार होणार आहे जी गेल्या शंभर वर्षांपासून रखडली आहे. रेल्वे प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता यावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आल्या आहेत तर बुलेट ट्रेन येत्या काही दिवसांनी सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे राज्यात असेही काही प्रकल्प आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहेत.

102 वर्षांपासून रखडलेला रेल्वे मार्ग प्रकल्प मार्गी लागणार

पंढरपूर-फलटण रेल्वे मार्ग प्रकल्प हा असा प्रकल्प आहे जो गेल्या 102 वर्षांपासून रखडलेला आहे. मात्र आता हा प्रकल्प लवकरच दृष्टिक्षेपात येणार आहे. हा प्रकल्प येत्या दीड महिन्यात मार्गी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा प्रकल्प इंग्रजांच्या काळात प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र याचे काम अजूनही सुरू झालेले नाही. पण आता गेल्या एका शतकापासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

इंग्रजांच्या काळात झाली होती आखणी

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी 1923 मध्ये जमिनीचे संपादन करण्यात आले होते. दरम्यान आता याच भूसंपादन झालेल्या जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी महसूल विभागाचे आणि रेल्वेचे अधिकारी संयुक्तपणे काम पाहणार आहेत अन याचा अहवाल येत्या दीड महिन्यात म्हणजेच 45 दिवसात सोलापूर रेल्वे विभागाकडे सुपूर्द करणार आहेत.

इंग्रजांच्या काळात या रेल्वे मार्गाची आखणी झाली होती आणि आता या मार्गावर रेल्वेने ब्रॉडगेज लाईन मंजूर केलेली आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील 18 गावांमध्ये जमीन संपादित झाली होती, दरम्यान याच जमिनीसाठी सर्व्हे केला जात आहे. या संपूर्ण जमिनीची रेल्वेने मागणी केलेली आहे. या अनुषंगाने आता या जमिनीवर कोणाचा ताबा आहे यासाठी हा सर्व्हे सुरू झालेला आहे.

कोणत्या गावात सुरु आहे सर्वेक्षण

मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वे मार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीसाठी सध्या स्थितीला पंढरपूर तालुक्यातील इसबावी, वाखरी, भाळवणी, भंडीशेगाव, धोंडेवाडी तसेच माळशिरस तालुक्यातील गुरसाळे, दहिगाव, धर्मपुरी, नातेपुते, पानीव, फॉडशिरस, मांडवे, विझोरी, वेळापूर, या गावात सर्वेक्षण सुरू झाले आहे.

हे काम येत्या 45 दिवसात पूर्ण होईल अशी शक्यता असून याबाबतचा अहवाल लवकरच सोलापूर रेल्वे विभागाकडे सुपूर्द होणार आहे. यामुळे या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा आशा पल्लवीत झाले आहेत. तब्बल 102 वर्षानंतर हा प्रकल्प मार्गी लागेल अशी आशा आता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. यामुळे आता या प्रकल्पाबाबत नेमक काय होतं हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe