Maharashtra New Railway : महाराष्ट्रातील रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्याला आता एका नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरू आहेत आणि काही प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. असाच एक महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे सोलापूर ते धुळे महामार्गावर कन्नड येथील औट्रम घाटात बोगदा विकसित केला जाणार आहे.

दरम्यान या कामाच्या संदर्भात काल अर्थातच आठ एप्रिल 2025 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि दळणवळण खात्याच्या मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली असून या बैठकीत औट्रम घाटातील बोगदा आणि चाळीसगावमार्गे बीड ते सोलापूर रेल्वेमार्ग सोबतच विकसित करण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
बोगदा आणि रेल्वेमार्ग बांधण्याबाबत या बैठकीत महत्त्वाची चर्चा झालीये असे मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे. हा बोगद्याचा प्रकल्प जवळपास 7000 कोटी रुपयांचा प्रकल्प असून या प्रकल्पाचा खर्च रेल्वे आणि एन एच ए आय यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.
दोन्ही प्राधिकरणामध्ये या प्रकल्पाचा 50-50% खर्च डिव्हाइड केला जाईल अशी माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, बोगद्याचे काम होण्यास मंजुरी मिळाली तर उत्तर, मध्य व दक्षिण भारताला महामार्गाची कनेक्टिव्हिटी मिळणे सोयीस्कर होणार आहे.
यामुळे या भागातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. खरेतर, 2011 पासून बोगद्याच्या कामाबाबत चर्चा केली जात आहे. मात्र या प्रकल्पाबाबत अजूनही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. या बोगद्याच्या कामासाठी जवळपास 14 वर्षांपासून चर्चा सुरू आहे मात्र यावर काहीही तोडगा निघालेला नाही.
मात्र आता एनएचएचआयने बोगद्याचा अलायन्मेंट तयार करून मंजुरीसाठी मुख्यालयाकडे पाठविला असतानाच रेल्वे मार्गासह बोगदा करण्याचा नवीन प्रस्ताव समोर येत आहे. यामुळे रेल्वे मार्ग प्रकल्पासह बोगदा करण्याचा नवीन प्रस्ताव मंजूर होणार का? ही गोष्ट विशेष पाहण्यासारखी ठरणार आहे.
मात्र बोगदा आणि नवा रेल्वे मार्ग विकसित झाला तर यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील तसेच खानदेशातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील मागासलेला भाग देखील जलद गतीने प्रगती करताना दिसणार आहे.
रेल्वे कनेक्टिव्हिटी साठी आणि रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटी साठी हा नवीन प्रस्ताव फारच फायद्याचा ठरणार असून या प्रस्तावावर सरकारकडून काय निर्णय होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून आहेत.