Maharashtra New Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये रेल्वेचे नेटवर्क विस्तारित केले जात आहेत. राज्यात नवं-नवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत. राज्यात विकसित होणाऱ्या नव-नवीन रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होतोय.
अशातच, आता मुंबईमध्ये विशेषता लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईला आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार असून यामुळे बदलापूर ते नवी मुंबई हा प्रवास वेगवान होणार आहे.

या नव्या रेल्वे मार्गामुळे 90 मिनिटांचा प्रवास फक्त 30 मिनिटात पूर्ण करता येईल असा दावा केला जातोय. अशा परिस्थितीत, आज आपण रेल्वेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या या रेल्वे मार्गाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार रूट ?
मिळालेल्या माहितीनुसार, कासगाव – मोरबे – मानसरोवर असा नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की, रेल्वेने यासाठी आधीच सर्वेक्षण सुरू केले आहे, तसेच या मार्गाला औपचारिक मंजुरी सुद्धा मिळाली आहे.
या नव्या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. या रेल्वे मार्गाची सुरुवात कासगाव येथे होणार असून या ठिकाणी नवीन रेल्वे स्थानक तयार होईल. हे नव रेल्वे स्थानक मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर आणि वांगणी या दोन्ही स्थानाकाच्या मधोमध राहणार आहे.
हा रेल्वे मार्ग प्रकल्प नवी मुंबई सोबत थेट कनेक्ट होणार असल्याने बदलापूरवासीयांना जलद गतीने नवी मुंबईमध्ये जाता येणे शक्य होणार आहे. हा नवा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर 90 मिनिटांचा प्रवास फक्त अर्ध्या तासात शक्य होईल.
सध्या स्थितीला जी वाहतूक व्यवस्था आहे त्याचा विचार केला असता सध्या प्रवासासाठी ठाण्यावरून लोकल बदलावी लागते किंवा मग निवडक ठिकाणी बसेसचा वापर करावा लागतो.
या महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. दरम्यान, आता हा रेल्वे मार्ग प्रकल्प लवकरच सत्यात उतरताना दिसणार आहे.
हा प्रकल्प फक्त बदलापुरकरांसाठी महत्त्वाचा आहे असे नाही, तर संपूर्ण उपनगरांतील प्रवाशांसाठी हा प्रकल्प एक भविष्यवेधी पाऊल ठरणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूरच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवी क्रांती घडणार आहे. बदलापूरकरांना यामुळे जलद गतीने नवी मुंबई पर्यंतचा प्रवास करता येणार आहे.