महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प

भारतीय रेल्वेचे सध्याचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लांबीचे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. देशात सध्या स्थितीला जवळपास साडेसात हजार रेल्वे स्थानके आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशातील रेल्वे नेटवर्क आणखी वाढवले जात असून यासाठी देशात नवनवीन रेल्वे मार्ग तयार होत आहेत.

Published on -

Maharashtra New Railway Project : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणि मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात एक नवा रेल्वे प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

या नव्या प्रोजेक्ट अंतर्गत कर्जत ते पनवेल दरम्यान चौथा ट्रॅक टाकला जाणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक सुरळीत होणार आहे. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे.

काय आहेत डिटेल्स? 

एम एम आर म्हणजेच मुंबई महानगर प्रदेशात कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून अलीकडेच कर्जत आणि पनवेलला जोडणाऱ्या नवीन चौथ्या रेल्वे मार्गाच्या योजनेला मध्य रेल्वेने मान्यता दिली आहे.

दरम्यान मध्ये रेल्वेच्या या निर्णयामुळे या परिसरातील वाहतुकीला एक नवीन उंची प्राप्त होणार आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत 29 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित होणार आहे.

या मार्गामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे यांच्यात थेट संपर्क साधता येईल अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एप्रिल 2023 मध्ये रोजी रेल्वे बोर्डाला 491 कोटी रुपयांचा डीपीआर अर्थातच अंतिम तपशीलवार प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा उद्देश व्यस्त कर्जत-पनवेल कॉरिडॉरवरील गर्दी कमी करणे आणि त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणे हाच आहे.

कधीपर्यंत पूर्ण होणार नवीन रेल्वे प्रकल्प ?

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे कडून विकसित केली जाणारी ही नवीन रेल्वे लाईन डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. महत्वाची म्हणजे या मार्गावर चालवण्यासाठी तीन लोकल ट्रेन सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत.

म्हणजे हा नवा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर लगेचच यावरून वाहतूक सुरू होणार आहे आणि यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. म्हणजेच या वर्षाच्या अखेरीस हा नवा रेल्वे मार्ग तयार होईल आणि त्यानंतर यावरून वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे.

या नव्या रेल्वे मार्गामुळे पनवेल ते कर्जत हा प्रवास वेगवान होणार आहे शिवाय पुणे ते नवी मुंबई या दरम्यानचा प्रवास सुद्धा वेगवान होईल अशी आशा आहे.

हा रेल्वे मार्ग प्रकल्प फक्त 29 किलोमीटर लांबीचा असला तरी देखील या प्रकल्पाचे फायदे फारच उल्लेखनीय आहेत आणि यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील विकासाला एक नवीन दिशा लाभणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News