आता महाराष्ट्रात MH 59 ! ‘या’ नावाजलेल्या तालुक्याला मिळाला नवा आरटीओ क्रमांक

महाराष्ट्रात पुन्हा एक नवीन आरटीओ कार्यालय सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या एका महत्त्वाच्या तालुक्याला एमएच 59 हा नवा आरटीओ क्रमांक मिळाला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरला एमएच 58 हा आरटीओ क्रमांक मिळाला होता आणि आता एमएच 59 हा नवा आरटीओ क्रमांक राज्याच्या एका तालुक्याला देण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra New RTO Number : नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला MH 58 हा नवा आरटीओ क्रमांक मिळाला होता. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मार्च 2025 मध्ये महाराष्ट्रात 58 वे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले आणि हे कार्यालय मीरा-भाईंदर येथे सुरू झाले होते.

म्हणजेच मीरा-भाईंदरला एमएच 58 हा आरटीओ क्रमांक मिळाला. दरम्यान आता राज्यातील एका महत्त्वाच्या तालुक्याला एमएच 59 हा नवा आरटीओ क्रमांक मिळाला आहे. आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या महत्त्वाच्या तालुक्याला नवा आरटीओ क्रमांक मिळाला आहे, याचा काय फायदा होणार याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या तालुक्याला आरटीओ कार्यालय मंजूर 

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालय मंजूर झाले आहे. यामुळे आता जत तालुक्याला MH-59 हा नवा RTO क्रमांक देण्यात आला आहे. खरंतर सांगली जिल्ह्यासह जत तालुक्याचा देखील मोठ्या वेगाने विकास होत आहे.

हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका असून या तालुक्यांमध्ये असणारी वाहनांची संख्या पाहता या तालुक्याला स्वतंत्र परिवहन अधिकारी कार्यालय म्हणजेच आरटीओ कार्यालय होणे आवश्यक असल्याची बाब विचाराधीन होती आणि याच पार्श्वभूमीवर आता जत तालुक्याला नवीन आरटीओ कार्यालय उपलब्ध झाले आहे आणि या तालुक्यासाठी नवीन आरटीओ क्रमांक जारी करण्यात आला आहे. आता जत तालुक्याची ओळख MH 59 यावरून होणार आहे.

तालुक्यातील नागरिकांना काय फायदा होणार ? 

महाराष्ट्रातील परिवहन विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, कर भरणा अशा सेवांसाठी आता सांगलीला जावे लागणार नाही, कारण की जत तालुक्यातच नवीन आरटीओ कार्यालय ओपन होणार आहे आणि तालुक्याला MH 59 हा नवा टॅग सुद्धा मिळेल अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

आता जतमध्येच सांगलीच्या आरटीओ कार्यालयात होणारी सर्व कामे होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. असं म्हणतात की, या RTO कार्यालयासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता.

त्यांनी जत मध्ये नव आरटीओ कार्यालय व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. दरम्यान आता आमदार गोपीचंद पडळकर यांचा हा पाठपुरावा यशस्वी झाला आहे. जत तालुक्याला नवीन आरटीओ कार्यालय मंजूर करण्याचा निर्णय फडणवीस सरकारकडून घेण्यात आला आहे.

खरे तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक येथे आम्ही आरटीओ कार्यालय सुरू करू असे आश्वासन दिले होते आणि निवडणुकीत दिलेले आश्वासन आता फडणवीस यांनी पूर्ण केले असून जतला नवीन RTO कार्यालय मंजूर केले आहे.

यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण आहे. MH-10 हा सांगली जिल्ह्याचा सध्याचा RTO क्रमांक आहे, आणि आतापर्यंत जतची ओळख सुद्धा याच आरटीओ क्रमांकावरून होत होती. परंतु आता जत तालुक्याची ओळख स्वतंत्र MH-59 या नव्या RTO क्रमांकाने होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe