पुणे, कोल्हापूर, नागपूरनंतर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार 2 नव्या वंदे भारत एक्सप्रेस ! कसे असणार रूट ?

Maharashtra New Vande Bharat Train : सप्टेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला.

या तीन गाड्यांमुळे सध्या महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 11 वर पोहोचली आहे. मात्र आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या आर्थिक राजधानीला आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीला आणखी दोन नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे.

सध्या मुंबईमधून पाच वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मात्र, मुंबईला आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याने ही संख्या सात वर पोहोचणार आहे. दरम्यान आता आपण मुंबईहून कोणत्या दोन शहरांसाठी वंदे भारत ट्रेन सुरू होणार याबाबत माहिती पाहणार आहोत.

मुंबईहून या शहरासाठी सुरू होणार वंदे भारत

सध्या स्थितीला मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी अन सीएसएमटी ते मडगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

दुसरीकडे आगामी काळात मुंबई ते बेंगलोर आणि मुंबई ते कोल्हापूर यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतो. सध्या स्थितीला पुणे ते कोल्हापूर दरम्यान ची गाडी सुरू आहे तीच गाडी मुंबईपर्यंत विस्तारली जाणार आहे.

म्हणजेच पुणे ते कोल्हापूर ही गाडी मुंबई ते कोल्हापूर अशी धावणार अशी शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई ते बेंगलोर अशी नवीन वंदे भारत ट्रेन देखील चालवली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

सध्या जी कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे तीच आगामी काळात मुंबईपर्यंत विस्तारित केली जाईल असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी दिले असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर वैभववाडीचे काम थांबले आहे ते काम तात्काळ सुरू व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

यासोबतच त्यांनी कोल्हापूर मुंबई वंदे भारत आणि कोल्हापूर बेंगलोर वंदे भारत सुरू करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता महाराष्ट्राला आगामी काळात आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळू शकते अशा चर्चांना वेग आला आहे.