महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 20 हजार कोटी रुपयांचा मेगाप्रकल्प ! जग्वार आणि मिग-29 लढाऊ विमाने, अपाचे हेलिकॉप्टरची दुरुस्ती होणार

महाराष्ट्रात लवकरच आणखी एक मोठा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. राज्यातील विदर्भ विभागात 20000 कोटी रुपयांचा एक नवीन प्रकल्प विकसित होणार आहे.

Published on -

Maharashtra,Nagpur,MRO Project, News : महाराष्ट्रात पुन्हा एक मोठा प्रकल्प विकसित होणार आहे. राज्यात 20000 कोटी रुपयांचा मेघा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. नागपूरच्या मिहान परिसरात हा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यामुळे उपराजधानी नागपूरला एक वेगळी ओळख प्राप्त होणार आहे. वीस हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प संरक्षण क्षेत्रातील एक मोठी गुंतवणूक राहणार आहे. दरम्यान आता आपण संरक्षण क्षेत्रातील याच मोठ्या प्रकल्पाची डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार प्रकल्प?

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स डिफेन्स कंपनी आणि अमेरिकेतील अग्रगण्य संरक्षण कंत्राटदार कोस्टल मेकॅनिक्स इंक यांच्यात नुकताच एक धोरणात्मक करार करण्यात आला आहे.

या करारानुसार नागपूर मध्ये एक MRO प्रकल्प उभारला जाणार आहे. हा 20 हजार कोटी रुपयांचा देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO) प्रकल्प राहील जो की या दोन्ही कंपन्यांकडून संयुक्तपणे विकसित करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

या वीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर यात जग्वार आणि मिग-29 लढाऊ विमाने, अपाचे हेलिकॉप्टर, एल-70 हवाई संरक्षण तोफा यांसारख्या अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे. याशिवाय, या प्रकल्पात संबंधित उपकरणांचे उत्पादन आणि सुटे भाग सुद्धा बनवले जातील अशी माहिती दिली जात आहे. 

हा मिहानमधील तिसरा मोठा प्रकल्प राहणार

नागपूरच्या मिहानमध्ये या आधी पण दोन मोठे एव्हिएशन प्रकल्प विकसित करण्यात आले आहेत आणि हा तिसरा मोठा प्रकल्प राहणार आहे.

याआधी मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशनने सुमारे 8 हजार कोटींचा हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प या परिसरात विकसित करण्याची घोषणा केली होती तर दुसरीकडे डसॉल्ट-रिलायन्सने फाल्कन बिझनेस जेट्स बनवण्याचा प्रकल्प या परिसरात विकसित करण्याची घोषणा केली होती.

खरंतर या प्रकल्पामुळे हजारो रोजगाराची निर्मिती होणार नाही पण हे प्रकल्प शेकडो अभियंत्यांना उच्च पगाराच्या नोकऱ्या देणार आहेत. शिवाय या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उपराजधानी नागपूरला जागतिक एरोस्पेस नकाशावर एक वेगळे स्थान मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!