Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या सेवेसाठी एक भन्नाट एप्लीकेशन विकसित करण्यात आले आहे. वास्तविक, सामान्य जनतेला वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी, कागदपत्रांसाठी, शासकीय कामकाजांसाठी, काही दाखले लागत असतात. यासाठी सामान्य जनतेला आत्तापर्यंत तलाठ्यावर अवलंबून राहावे लागत होते.
मात्र आता शासनाने महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट नामक एक ॲप्लिकेशन विकसित केल आहे ज्याच्या मदतीने घरबसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सामान्य जनतेला विवाह नोंदणी, जन्ममृत्यू, दारिद्र्यरेषेखालील दाखला, विवाह नोंदणी अर्ज करणे, 8 अ चा उतारा, यांसारखी महत्त्वाची दाखले आणि कागदपत्रे नागरिकांना काढता येणे शक्य होणार आहे.
खरं पाहता अनेकदा ग्रामस्थांना ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध होणाऱ्या या दाखल्यांची गरज भासत असते. मात्र ग्रामस्थांना आपण घरपट्टी दिलेली नाही, पाणीपट्टी दिलेली नाही अशी एक ना अनेक कारणे पुढे करत ग्रामपंचायत च्या माध्यमातून हा दाखला ग्रामस्थांना उपलब्ध होत नाही. यामुळे ग्रामस्थांची कामे खोळंबतात. या महत्त्वाच्या दाखल्यां अभावी अनेकदा शासकीय योजनेपासून ग्रामस्थांना वंचित रहावे लागते.
मात्र आता या दाखल्यांसाठी ग्रामपंचायतीवर तसेच तलाठ्यावर ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागणार नाही. यासाठी शासनाने महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट नामक एप्लीकेशन सुरू केलं असून याच्या मदतीने अगदी मोफत कोणत्याही शुल्काविना हे दाखले ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहेत.
एवढेच नाही तर एप्लीकेशनच्या माध्यमातून घरपट्टी पाणीपट्टी भरणा, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची माहिती, आणि विवाह नोंदणी देखील करता येणे शक्य होणार आहे. दरम्यान आज आपण हे ॲप्लिकेशन कस डाऊनलोड करायचं याविषयी जाणून घेणार आहोत.
महा इ ग्राम सिटीजन कनेक्ट एप्लीकेशन कुठे डाउनलोड करणार?
हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर एप्लीकेशन डाऊनलोडर प्लॅटफॉर्मवर आपणास विजीट करावे लागेल. यानंतर या ठिकाणी महा ईग्राम सिटीजन कनेक्ट असं सर्च करून आपण एप्लीकेशन डाउनलोड करू शकता. किंवा https://apkpure.com/mahaegram-citizen-connect/com.gov2egov.citizenforum या लिंक वर क्लिक करून हे एप्लीकेशन डाउनलोड करू शकता.
एप्लीकेशनचा वापर कसा करायचा
महा इ ग्राम सिटीजन नामक एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर आपणांस हे ॲप्लिकेशन मध्ये सर्वप्रथम नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून मग सदर मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपी च्या माध्यमातून वेरिफिकेशन करून रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा या एप्लीकेशन मध्ये लॉगिन घ्यावे लागणार आहे.
यानंतर मग या एप्लीकेशनमध्ये आपण आपला जिल्हा तालुका आणि ग्रामपंचायत सिलेक्ट करून आपणास आवश्यक ती कागदपत्रे किंवा दाखले तसेच पाणीपट्टी नळपट्टी भरणा याशिवाय विवाह नोंदणी अर्ज करणे यांसारखी कामे करू शकणार आहात.
दरम्यान या ॲप्लिकेशनच्या वापरा संदर्भात जनजागृती केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातही या एप्लीकेशनच्या वापराला चालना मिळाली आहे. जिल्ह्यात एकूण 1311 ग्रामपंचायत असून या ग्रामस्थांमधील हजारो नागरिकांनी हे एप्लीकेशन डाउनलोड केले आहे.ज्या ठिकाणी मात्र नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी एप्लीकेशन ला अपेक्षित असा रिस्पॉन्स मिळत नाही. मात्र, नेटवर्क सुसह्य असलेल्या भागात हे ॲप्लिकेशन मोठ्या प्रमाणात आता वापरले जात आहे.
महा इ ग्राम अँप वर मिळणार हे 33 दाखले
या एप्लीकेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांना 33 प्रकारचे दाखले उपलब्ध होणार असल्याचे सांगितले गेले आहे. यामध्ये जन्म मृत्यू दाखला, विवाह नोंद दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, विवाह नोंदणी अर्ज करणे, आठ अ उतारा, घरपट्टी पाणीपट्टी भरणा करणे, एवढेच नाही तर यामध्ये ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती मिळणार आहे. आपल्या सरकारच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध सुविधा एप्लीकेशन मध्ये इनबिल्ड करून दिल्या आहेत. निश्चितच या एप्लीकेशनच्या माध्यमातून ग्रामस्थांना दाखल्यांसाठी येणारी अडचण सोडवली जाणार आहे.