Maharashtra News : प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी तसेच शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मार्च महिना समाप्तीकडे आला आहे अन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता देखील वाढू लागली आहे.
एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्राथमिक शाळेतील आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला आहे. खरे तर उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यासंदर्भातील निवेदने शिक्षण संचालकांकडे प्राप्त झाली होती.
याच निवेदनाचा विचार करून आता राज्यातील सर्वच शाळांच्या वेळा बदलल्या गेले आहेत. महत्वाचे म्हणजे प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या वेळा एक असाव्यात असा आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सुर्यवंशी यांनी काढले आहेत.
प्राथमिक विभागाच्या शिक्षण संचालकाकडून आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकाकडून यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढले गेले आहेत. त्यानुसार आता राज्यातील सर्वच शाळांच्या वेळा पुन्हा बदलणार आहेत. आता आपण प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे नवीन वेळापत्रक कसे राहणार याचा आढावा घेणार आहोत.
कसं राहणार नवीन वेळापत्रक?
शिक्षण संचालकांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकानुसार आता राज्यातील प्राथमिक शाळा सकाळी सात वाजता भरणार आहेत आणि सकाळी 11:15 मिनिटांनी प्राथमिक शाळा सुटणार आहेत.
नव्या वेळापत्रकानुसार प्राथमिक शाळेचा परिपाठ सकाळी सात ते सव्वा सात दरम्यान राहणार आहे. तसेच सकाळी सव्वा सात वाजेपासून ते सव्वा अकरा वाजेपर्यंत एकूण सात तासिका होतील.
एक तासिका 30 मिनिटांची राहणार आहे. माध्यमिक शाळांबाबत बोलायचं झालं तर माध्यमिक शाळा सकाळी सात वाजता भरेल आणि सकाळी 11:45 मिनिटांनी माध्यमिक शाळा सुटणार आहेत. माध्यमिक शाळांमध्ये या काळात एकूण आठ तासिका होणार आहेत.
एकंदरीत वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आता माध्यमिक आणि प्राथमिक शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून दोघांच्या वेळा जवळपास सेम राहणार आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा एकाच वेळी भरतील मात्र प्राथमिक शाळा थोड्या लवकर सुटतील आणि माध्यमिक शाळा थोड्या उशिराने सुटणार आहेत.