महाराष्ट्रातील ‘हे’ 2 महामार्ग एकमेकांना जोडले जाणार, मुंबई अन नागपूरहून दिल्ली गाठणे सोपे होणार

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा असाच एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प आहे. हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असून या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे काम आता पूर्ण झाले आहे. या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचे आत्तापर्यंत तीन टप्पे वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra News

Maharashtra News : राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत, अजूनही काही महामार्गाची कामे सुरू आहेत. तसेच काही महामार्गांची कामे अंशतः पूर्ण झाली आहेत आणि बाकी राहिलेली कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा असाच एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प आहे.

हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असून या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे काम आता पूर्ण झाले आहे. या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचे आत्तापर्यंत तीन टप्पे वाहतुकीसाठी सुरू झाले आहेत.

नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू झाला होता. नंतर 2023 मध्ये 80 किलोमीटर लांबीचा शिर्डी ते भरवीर हा टप्पा सुरू झाला. 2024 मध्ये 25 किलोमीटर लांबीचा भरवीर ते इगतपुरी हा टप्पा सुरू झाला.

आता इगतपुरी ते आमने हा शहात्तर किलोमीटर लांबीचा चौथा टप्पा 2025 च्या फेब्रुवारी मध्ये सुरू होणार आहे. दरम्यान याचा लाभ जास्तीत जास्त वाहनांना आणि प्रदेशांना व्हावा यासाठी या महामार्गाची जोडणी विविध भूप्रदेशांना सुद्धा दिली जात आहे.

समृद्धी महामार्गावरून राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून यामुळे मुंबई ते दिल्ली किंबहुना नागपूर ते दिल्ली हा प्रवास सुलभ होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास वेगवान होणार आहे.

सध्या या प्रवासासाठी सोळा तास लागतात मात्र भविष्यात हा प्रवास आठ तासांवर येणार आहे. दुसरीकडे, आमणे येथून मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा ४ किमीचा रस्ता बांधला जात आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरून वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गाची बांधणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जात आहे. आमणेपासून ४.२ किमीचा रस्ता पार करून वडोदरा-मुंबई द्रुतगती महामार्गावर येता येईल. येथून पुढे वडोदरा आणि थेट दिल्लीपर्यंत प्रवास करता येईल.

यामुळे नागपूरवरून दिल्ली किंवा मुंबईहून दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. नक्कीच यामुळे महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. उद्योग शिक्षण कृषी पर्यटन अध्यात्म अशा विविध क्षेत्राला या महामार्ग प्रकल्पाचा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe