Maharashtra News : राज्यातील तळीरामांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात सलग चार दिवस दारूची दुकाने बंद ठेवली जाणार असून या संदर्भातील परिपत्रक नुकतेच शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत साठी निवडणुकं प्रक्रिया पूर्ण झाली आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसाठी येत्या 15 तारखेला म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 तारखेला निवडणुकीचा निकाल अर्थातच मतमोजणी होणार असे जाहीर केले आहे.
या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून तसेच निवडणुकीत उभ्या उमेदवारांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे.
खरे तर आता ही प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सबंध महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सध्या पुण्यात ठाण मांडून बसले आहेत.
दादांचे लक्ष फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवर केंद्रित असल्याचे दिसत आहे. दरम्यान 15 जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ड्राय डे चे वेळापत्रक जाहीर केले आहे. म्हणजे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात दारूची दुकाने बंद राहणार आहेत.
किती दिवस बंद राहतील दारूची दुकाने?
13 जानेवारीला प्रचार थांबणार आहे. दरम्यान प्रचार थांबला की लगेच ड्रायडे सुरू होईल. 13 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते मतमोजणी होईपर्यंत अर्थात 16 जानेवारी 2026 रोजी जोपर्यंत निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत दारूची दुकाने बंद राहतील.
म्हणजेच 14 आणि 15 तारखेला संपूर्ण दिवस दारूची दुकाने बंद राहतील. या कालावधीत दारू दुकान, बार आणि परमिट रूम बंद राहणार आहेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या क्षेत्रांमध्ये हा निर्णय लागू राहणार आहे. म्हणजेच राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका होतील त्या ठिकाणी दारूची दुकाने सांगितलेल्या कालावधीसाठी बंद ठेवली जाणार आहेत.













