महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांचा कॉम्प्रेसरचा प्रकल्प उभारला जाणार ! रोजगारनिर्मितीसह राज्याचा चेहरा-मोहरा बदलणार

महाराष्ट्रात लवकरच एका नव्या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात जवळपास 1000 कोटी रुपयांचा कॉम्प्रेसर चा भव्य प्रकल्प विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे नव्या रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

Published on -

Maharashtra News : महाराष्ट्रातील जनतेसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा नव्या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात तब्बल 1000 कोटी रुपयांचा नवा कॉम्प्रेसरचा प्रकल्प उभारला जाईल आणि यामुळे हजारो नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जागतिक रेफ्रिजरेशन क्षेत्रातील आघाडीच्या ‘एम्ब्रॅको’ कंपनीने छत्रपती संभाजी नगर येथील शेंद्रा एमआयडीसी च्या इंडस्ट्रियल झोनमध्ये 1029 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची मोठी घोषणा केली आहे. एम्ब्रॅको बाबत बोलायचं झालं तर ही कंपनी निदेक ग्लोबल अप्लायन्स समूहाचा एक भाग आहे.

कधी सुरू होणार नवा प्रकल्प?

ऑरिक सिटीच्या दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर मध्ये गेल्या काही वर्षात अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे. दरम्यान आता या ठिकाणी 1 हजार 29 कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प उभारला जाईल.

एम्ब्रॅको कंपनी येथे कॉम्प्रेसरचा मोठा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प 50 एकर जमिनीवर विकसित होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर यातून दरवर्षी 60 लाख कॉम्प्रेसर युनिटचे उत्पादन शक्य असल्याचा दावा केला जातोय.

घरगुती त्याचप्रमाणे व्यावसायिक फ्रीजसाठीच्या कॉम्प्रेसर युनिटचे उत्पादन या ठिकाणी होणार आहे. कॉम्प्रेसर युनिटसोबतच ऊर्जा कार्यक्षम इन्व्हर्टरचेही या ठिकाणी उत्पादन होईल अशी माहिती संबंधित कंपनीकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान हा प्रकल्प पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये सुरू होणार आहे.

किती लोकांना मिळणार रोजगार?

मराठवाड्यात सुरू होणाऱ्या या भव्य प्रकल्पामुळे राज्यात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर 750 ते 1000 लोकांना रोजगार मिळणार अशी माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

खरंतर या कंपनीचे अधिकारी नुकत्याच दीड दोन महिन्यांपूर्वी ऑरिक सिटी शेंद्रा एमआयडीसीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक जागेची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी शेंद्रा आणि बिडकीन एमआयडीसीला त्यावेळी भेट देऊन प्रकल्पासाठी आवश्यक जागेची पाहणी केली.

दरम्यान शेंद्रा एमआयडीसी मधील 50 एकर भूखंड त्यांना दाखवण्यात आला आणि अधिकाऱ्यांनी त्याचवेळी या ठिकाणी नव्या प्रकल्पाची उभारणी होईल अशी घोषणा केली. म्हणून हा नवा प्रकल्प आता मराठवाड्याच्या विकासाला आणखी बळ देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News