Maharashtra News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील पर्यटनाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पर्यटन वाढीसाठी केंद्रातील मोदी सरकारकडून आणि राज्यातील महायुती सरकारकडून गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. गेल्या शिंदे सरकारने देखील पर्यटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले होते आणि फडणवीस सरकारने देखील पर्यटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारकडून कोकणात महाराष्ट्रातील पहिला काचेचा पुल विकसित करण्यात आला आहे. हा काचेचा पूल महाराष्ट्राचे मालदीव म्हणजेच तळ कोकणात आहे. खरेतर तळ कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते.

नैसर्गिक सौंदर्य, बीचेस समुद्रकिनारा, नारळाची उंच उंच झाडे, समुद्राच्या पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या लाटा, नदी नाले, हिरवेगार जंगल एक्सप्लोर करण्यासाठी जगभरातील पर्यटक तळ कोकणात गर्दी करतात. दरम्यान याच तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील पहिला काचेचा पूल तयार करण्यात आला आहे.
कुठे तयार झाला पहिला काचेचा पूल
कोकणात पर्यटकांसाठी शेकडो ठिकाणे उपलब्ध आहेत. मात्र तळ कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण. म्हणूनच कोकण फिरायला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या लिस्टमध्ये मालवणचा समावेश असतो.
मालवण येथील समुद्रकिनारा आणि किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याला भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख प्राप्त आहे. याच पर्यटनाच्या जिल्ह्यात नापणे नावाचा धबधबा आहे.
दरम्यान याच धबधब्याजवळ महाराष्ट्रातील पहिला काचेचा पुल विकसित करण्यात आला असून या धबधब्याचे विहंगम दृश्य काचेच्या पुलावरून बघण्याचा आनंद आता पर्यटकांना लुटता येणार आहे.
नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलाचे उद्घाटन संपन्न
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे धबधब्यावर विकसित करण्यात आलेल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले आहे. याचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटनाचा भव्य सोहळा समाप्त झाल्यानंतर हा काचेचा पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी खुला झाला आहे.
तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी येथील नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. हा ब्रिज सिंधुरत्न योजनेतून बांधण्यात आला असल्याची माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे.
दरम्यान या पुलाच्या लोकार्पणायावेळी मंत्री नितेश राणे यांनी या पुलामुळे हे ठिकाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण झाले असल्याचा विश्वास व्यक्त केला असून यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.